मुंबई महापालिका निवडणूक
भाजपच्या वागणुकीमुळे रिपाइंमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटापावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. दुसरीकडे महायुतीत महत्त्वाचा घटक असलेला रिपाइं(आ)कडे भाजपने दुर्लक्ष केले आहे. सोमवारी वसंत स्मृती येथे दुपारी चर्चेला बोलावून रात्री उशिरापर्यंत भाजप नेते तिकडे गेलेच नाही. या भाजपच्या वागणुकीमुळे रिपाइंमध्ये नाराजी पसरली आहे.
पूर्वी भारतीय जनता पक्षाने केवळ आश्वासनांपलीकडे जाऊन कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, भाजपकडून चर्चेचे फक्त संकेत दिले गेले; मात्र प्रत्यक्ष चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही. शिष्टमंडळाला वारंवार प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.
२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने केलेल्या आश्वासनाचे पालन केले नव्हते. रिपाइंला सोडलेल्या जागेवर भाजप उमेदवारांनी बंडखोरी केली होती. तेव्हा ते फॉर्म मागे घेतील, असे सांगण्यात आले, पण त्यांनी फॉर्म मागे घेतले नाहीत. भाजपकडून चर्चेसाठी बोलवले जाते, पण मुद्दामहून उशीर केला जातो. अखेरच्या दिवशी जागा सोडण्याचे आश्वासन देतात; मात्र तेथेही युती धर्माचे पालन करत नाहीत. या अनुभवामुळे या वेळेस रिपाइंने स्वतंत्र वाटचालीचा निर्णय घेण्याची शक्यता वाढली आहे. रिपाइंने सुमारे ७०हून अधिक प्रभागांमध्ये उमेदवारांची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश असून, मुंबईतील विविध दलितबहुल विभागांतून स्वतंत्र लढतीला पाठिंबा वाढताना दिसतो आहे.
========
रिपाइंचे उमेदवार अर्ज दाखल करतील : रवी गायकवाड
चेंबूर येथील प्रभाग १५२ आणि १५५ साठी रिपाइंचे उमेदवार नामांकन अर्ज मंगळवारी दाखल करणार आहेत. तर प्रभाग १५० मध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत आणखी उमेदवार अर्ज दाखल करतील, असे चेंबूर तालुका अध्यक्ष रवी गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.