मुंबई

बेस्टच्या धडकेत चौघांचा मृत्यू

CD

बेस्टच्या धडकेत चौघांचा मृत्यू
भांडुप रेल्वेस्थानकाजवळ अपघात; नऊ जखमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : भांडुप येथील आगारातून बस बाहेर काढताना चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी आहेत. ही घटना सोमवारी रात्री १०च्या सुमारास घडली. या प्रकरणी बसचालकाला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केल्याचे पोलिस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी सांगितले.
भांडुपचा टेंभीपाडा परिसरात चिंचोळे रस्ते असल्याने या भागात गेली अनेक वर्षे केवळ मिनी बस सुरू होत्या. आधीच अरुंद रस्ते, त्यात अवैध फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे आणखी चिंचोळ्या झालेल्या रस्‍त्यावरून वाहतूक सुरू असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून भांडुप आगारातून मोठ्या वातानुकूलित बस सुरू करण्यात आल्या. आकाराने मोठ्या असलेल्या या वातानुकूलित बसमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना जागा उरत नव्हती. तसेच आगारातून वळण घेतानाही अनेकदा अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. अशाच प्रकारे सोमवारी रात्री भांडुप स्टेशन मार्गावर बस मागे घेत असताना मागे असलेल्या प्रवाशांचा अंदाज न आल्याने बस थेट प्रवाशांना धडकली. आगाराजवळच भांडुप पोलिसांची चौकी असून, अपघात घडल्यानंतर तातडीने पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी ९ डिसेंबरला कुर्ला परिसरात इलेक्ट्रिक बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ जण जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

SCROLL FOR NEXT