नववर्षानिमित्त मेट्रो-१ मध्यरात्रीपर्यंत धावणार
मुंबई, ता. ३० : नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबई मेट्रो -१ने बुधवारी (ता. ३१) मध्यरात्रीपर्यंत मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दररोजच्या ४७६ नियमित फेऱ्यांशिवाय अतिरिक्त २८ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी ५.३० वाजता वर्सोवा आणि घाटकोपर येथून पहिली गाडी सुटेल. त्याचबरोबर बुधवारी मध्यरात्री आणि गुरुवारी १ जानेवारीला पहाटे २.१४ वाजेपर्यंत १२ मिनिटांच्या अंतराने गाड्या चालवल्या जाणार आहेत.