मुंबई

आप्तही गेले अन् आधारही निसटला

CD

आप्तही गेले अन् आधारही हरपला
अपघातात मृत, जखमींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुंबई, ता. ३० : भांडुप अपघातास जबाबदार चालकाला अटक झाला, त्याच्यावर खटला चालेल, तो दोषी आढळून त्याला शिक्षाही होईल; पण विनाकारण, अकाली मृत्यू झालेली आमची माणसे परत येतील का? या अपघाताने हक्काचा माणूस गमावलाच; पण सोबत संपूर्ण कुटुंबाचा आधारही हरपला, अशा प्रतिक्रिया अपघातात मृत्यू झालेल्या चौघांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.

टेंभीपाडा, रावते कंपाउंड येथील भक्ती प्रसाद चाळीत राहणारी वर्षा अलीकडेच टाटा रुग्णालयात परिचारिका म्हणून रुजू झाली होती. त्या आधी ती शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. वर्षा मूळची साताऱ्यातील खटाव तालुक्याची. चुलत बहिणीच्या लग्नाच्या तयारीसाठी नोकरीवरून सुट्टी घेऊन गावी गेली होती. सोमवारी रात्री ती परतली. घरी जाण्यासाठी बेस्टच्या रांगेत उभी होती. तेव्हा हा अपघात घडला.

मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर आईवडील आणि भावंडांना वर्षाचाच आधार होता. या अनपेक्षित अपघाताने सावंत कुटुंबातील एकमेव कमावता हात निखळला. त्यामुळे मुलीच्या अकाली निधनाचे दुःख आणि भविष्याच्या चिंतेत सावंत कुटुंब अडकल्याची प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिली.

साईनगर येथे पती, दोन मुलींसह राहणाऱ्या प्रणिता रासम दादर येथील नृत्याच्या प्रशिक्षण वर्गातून मुलीला घेऊन घरी परतत होत्या. तेव्हा ही घटना घडली. अरुंद रस्त्यावर मिनी बस हटवून मोठ्या, इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय या अपघाताचे मूळ कारण आहे. त्यात चालकाचा बेदरकारपणा पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, अशी प्रतिक्रिया प्रणिता यांचे पती संदीप यांनी व्यक्त केली. तर मृत मानसी यांच्या नातेवाइकांनीही या अपघातास वाहतूक पोलिस आणि बेस्ट प्रशासनास जबाबदार धरले आहे.

पत्नीशी बोलता बोलता गेला जीव
वर्षा सावंतप्रमाणे भांडुपच्या गणेशनगर परिसरात राहणारा प्रशांत शिंदेही एकटा कमावता होता. वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून काम करणाऱ्या प्रशांतने रात्री घरी येताना त्याने पत्नीला फोन केला. भाजी कोणती आणू, असे त्याने पत्नीला विचारले; मात्र तिचे उत्तर येण्याआधीच अनियंत्रित बेस्टने त्याला चिरडले. प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती त्याचे बंधू राजेश यांनी दिली. प्रशांतची परिस्थिती बेताची होती. त्याची पत्नी किमान आपल्या पायावर उभी राहावी, इतकी मदत शासनाने करावी, अशी अपेक्षा राजेश यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT