मुंबई

‘एबी’ फॉर्म घेतला परत

CD

‘एबी’ फॉर्म घेतला परत
मुंबई, ता. ३० : पक्षाने एबी फॉर्म दिला, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोषही केला; मात्र फटाक्यांचा धूर हवेत विरत नाही तोच पक्षाने फॉर्म परत घेत दुसऱ्याच व्यक्तीला देत उमेदवारी जाहीर केली. विक्रोळीतील मनसे पदाधिकारी संतोष देसाई यांच्यासोबत हा प्रकार घडला. शाखा अध्यक्ष देसाई यांना सोमवारी (ता. २९) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक ११९ मधून मनसेने एबी फॉर्म दिला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळीत फटाक्यांच्या आतषबाजी करीत देसाई यांचे जंगी स्वागत केले. शुभेच्छांचे फोन खणखणू लागले; मात्र तासाभराच्या अंतराने वरिष्ठ नेत्यांनी देसाई यांना संपर्क साधला. आघाडीतील मित्र पक्ष ठाकरे गटाच्या नेत्यांनी उमेदवार बदलासाठी हट्ट धरल्याचे सांगत त्यांची उमेदवारी विश्वजित ढोलम यांना देत आहोत, असे कळवले. या घडामोडींना दुजोरा देताना देसाई यांनी ‘उमेदवारी हातची गेल्याची रुखरुख आहे; पण पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश मी अंतिम मानतो. त्यामुळे त्या आदेशाचे पालन करतो,’ अशी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT