मुंबई

सायबर गुन्हे रोखण्यासाठी हवी ओघवती जनजागृती

CD

सायबर गुन्हे रोखण्यासाठी हवी ओघवती जनजागृती
ठोस कार्यक्रम निश्‍चित करणे आवश्‍यक ः सायबरतज्ज्ञ गौतम मेंगळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : रुग्णालयातील सीसीटीव्ही हॅक करून गर्भवती, प्रसूत महिलांवरील उपचाराचे विक्रीस खुले करण्यात आलेले व्हिडिओ, इंटरनेटशी जोडलेली प्रिंटर, टीव्ही, राउटर आदी उपकरणे हॅक करून घडलेले गुन्हे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित मालवेअरचा धोका ओळखून ओघवती जनजागृती आवश्‍यक आहे. यासाठी सरकार, खासगी आणि वैयक्तिक पातळीवरील जनजागृतीचा ठोस कार्यक्रम निश्चित करणे अपेक्षित आहे, असे मत सायबरतज्ज्ञ गौतम मेंगळे यांनी व्यक्‍त केले.
गौतम मेंगळे म्‍हणाले, की सायबर गुन्हेगारी विरोधातील लढाईत नेमकी आणि आक्रमक जनजागृती प्रमुख अस्त्र आहे. तंत्रज्ञान जसे ओघवते, क्षणाक्षणाला अद्ययावत होते त्याच वेगाने सायबर गुन्ह्यांची पद्धत बदलते. आरोपी समाजमनाचा, सायबर निरक्षरतेचा अभ्यास करून, अंदाज बांधून गुन्हे करतात. त्याच वेगाने जनजागृती ओघवती ठेवणे अपेक्षित आहे. मात्र आपल्याकडील जनजागृती फक्त आर्थिक फसवणुकीबाबत अत्यंत मर्यादित स्वरूपात, साचेबद्ध स्वरूपात केली जाते. वैयक्तिक पातळीवर सायबर सुरक्षेचे उपाय मोबाईलपासून सुरू होतात आणि लॅपटॉपपर्यंत संपतात.
प्रत्यक्षात इंटरनेटशी जोडलेले प्रत्येक उपकरण, टीव्ही संच, राउटर अगदी प्रिंटरही हॅक झाले आहेत. गुजरातच्या एका रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील सीसीटीव्ही हॅक करून महिलांवरील विशेषतः गरोदर, प्रसूत महिलांवरील उपचाराचे चित्रण चोरून ते आरोपींनी समाजमाध्यमांवर पोस्ट करीत संपूर्ण चित्रण विक्रीस काढले. देशभर गाजलेल्या या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक वास्तव पुढे आले. ते असे की संबंधित रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणाऱ्या कंपनीने सुरुवातीस अगदी सोपा, साधा पासवर्ड दिला होता. तो बदलणे रुग्णालयाची जबाबदारी होती. मात्र पासवर्ड तसाच ठेवल्याने यंत्रणा अगदी सहजरीत्या सायबर गुन्हेगारांच्या भक्ष्यस्थानी पडली.
पूर्वी व्हायरस, मालवेअरचा मर्यादित धोका होता. तो अचूक प्रतिबंधात्मक उपाययोजना करून टाळणे शक्य होते. अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेआधारे तयार करण्यात आलेले मालवेअर संबंधित यंत्रणेत कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत हे ओळखून कचाट्यात न सापडण्यासाठी स्वतःहूनच बदल करून घेतात आणि आत शिरतात. आपल्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील चर्चांमध्ये चॅट जीपीटी किंवा छायाचित्रे, चित्रण एडिट करण्यापुरत्याच मर्यादित राहतात. गुन्हेगार समाजमनाचा विचार करू शकतात, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अचूक वापर करू शकतात, तर मग शासन, खासगी कंपन्या, वैयक्तिक पातळीवर आपण का नाही, असा प्रश्‍न गौतम मेंगळे यांनी उपस्‍थित केला आहे.

बदलाची गरज कशासाठी?
- सायबर गुन्ह्यांचा उद्देश सारखाच आहे, फक्त पद्धत बदलते आहे. या बदलत्या पद्धती नागरिक, खासगी व शासकीय आस्थापनांना अवगत करून देणे क्रमप्राप्त आहे. त्यासोबत या नवनव्या प्रकाराच्या गुन्ह्यांपासून वाचावे कसे, याचीही माहिती निरंतर पसरवणे आवश्यक आहे.
- सायबर गुन्ह्यांत यावर्षी घडलेल्या आर्थिक फसवणुकीचा हिशोब भयावह आहे. यावर्षी जुलै महिन्यापर्यंत प्रत्येक दिवशी आठ सर्वसामान्य नागरिक, कंपन्या किंवा वित्त संस्थांना संभ्रमित करून भामट्यांनी संबंधितांच्या बँक खात्यांतून सरासरी अडीच कोटी रुपये परस्पर उकळले आहेत.
- गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांत सुमारे ८९० कोटींची फसवणूक झाली होती. यंदा जुलै महिन्यापर्यंत फसवणूक रकमेचा आकडा ५५० कोटींवर गेला होता. गेल्या सहा वर्षांतील सायबर फसवणूक दोन हजार कोटींवर गेली आहे. त्या सरासरीच्या तुलनेत या वर्षीची फसवणूक रक्कम दुपटीने अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT