विविध कारणांनी छाननीत अर्ज झाले बाद
सर्व पक्षांच्या उमेदवारांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून मंगळवारी (ता. ३०) शेवटच्या दिवशी दोन हजार ५१६ अर्ज दाखल करण्यात आले. मात्र आज अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर विविध कारणांनी काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यात अपक्षांची संख्या मोठी असली तरी काँग्रेस, भाजप, आप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांतर्फे भरण्यात आलेले अर्जही बाद झाले आहेत. यात प्रभाग क्रमांक १०३ ते १०८, १०९, २०० ते २०६, १९३ ते १९९, १६३, १७५ व १७१ येथे दाखल केलेल्या अर्जांचा समावेश आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी जवळपास सर्वच पक्षांनी जागावाटप, एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया शेवटच्या दोन-तीन दिवसापर्यंत रखडवली. त्यामुळे उमेदवारांना ३० डिसेंबरला अर्ज सादर करावे लागले. उमेदवारी निश्चित करण्यासाठी गेलेला वेळ, आयत्या वेळी कागदपत्रांची जमवाजमव, जातवैधता प्रमाणपत्र, अर्जातील अपूर्ण माहिती इत्यादी कारणांनी छाननीत अपक्षांसह काही पक्षांच्या उमेदवारांचे अर्जही बाद झाले आहेत. अर्ज बाद झाल्याने अशा उमेदवारांना निवडणूक लढवता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.