मुंबई

आयुष्मान कार्ड निर्मितीला गती मिळणार

CD

आयुष्मान कार्ड निर्मितीला गती
राज्यात ३७ टक्के आयुष्मान कार्ड निर्मिती पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यात राबवण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एकूण नऊ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत तीन कोटी ४४ लाख कार्डांची निर्मिती पूर्ण झाली आहे. यानुसार राज्यात सध्या सुमारे ३७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून, उर्वरित ६३ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. दरम्यान, २०२६ या नवीन वर्षात किमान ८० ते ९० टक्के कार्ड वाटप करण्याचे लक्ष्य सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येतात. हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, अपघात उपचारांसह हजारहून अधिक उपचार पॅकेजेसचा समावेश असल्यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील आयुष्मान कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास आरोग्यसेवांतील असमानता कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व परवडणारी उपचार व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
...............
आरोग्य खर्चात लक्षणीय घट
विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरीब भागात आयुष्मान कार्डमुळे कॅशलेस उपचारांची उपलब्धता वाढली असून, वैयक्तिक आरोग्य खर्चात लक्षणीय घट झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये या कार्डच्या आधारे उपचार शक्य होत असल्याने नागरिकांचा सहभाग वाढत आहे.
.......
नवीन मानधन दर
कार्ड तयार करताना प्रत्येक केवायसीसाठी पाच रुपये दिले जात होते. आता दर वाढवून २० रुपये दिले जात आहेत, तर कार्ड वितरणासाठी तीन रुपयांवरून १० रुपये दर करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण मानधन आता ३० रुपयांवर आले आहे.
.......
पात्र लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष नोंदणी मोहीम, आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायत स्तरावरील कार्ड निर्मिती तसेच शहरी भागात मोबाईल युनिट्सद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे.
-डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक, आरोग्य विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT