मुंबई

राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचे उल्लंघन

CD

राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचे उल्लंघन
महापालिकेकडून आठ हजारांहून अधिक कारवाया  

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे; मात्र  राजकीय पक्षांना त्याचा विसर पडला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, झेंड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे.  महापालिकेकडून १७ दिवसांत आठ हजारांहून अधिक कारवाया  करण्यात आल्या आहेत. 
 खासगी आणि सरकारी जागांपेक्षा सार्वजनिक मालकीच्या जागांवर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खासगी जागांवर जाहिरातबाजीसाठी संबंधित सोसायट्या किंवा आस्थापनांना शुल्क द्यावे लागत असल्याने ‘फुकट’च्या सार्वजनिक किंवा सरकारी जागा बऱ्या, याकडे जाहिरात बहाद्दरांचा कल अधिक दिसून येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक जाहिराती हटवल्या असून, त्यापैकी सर्वाधिक जाहिराती या सार्वजनिक जागेवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांमध्ये जाहिरातीचे साहित्य हटवण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पालिकेने शहराच्या विविध भागांतून २,१०३ पेक्षा जास्त अनधिकृत राजकीय जाहिरात साहित्य हटवले होते. या कारवाईला आणखी वेग देण्यात आला.
...
कारवाया अशा   
सरकारी जागेवर खराब केलेल्या भिंती १७, पोस्टर ११२, बॅनर १७८ अशा एकूण  ३०७ कारवाया करण्यात आल्या.  सार्वजनिक मालमत्तेत खराब भिंती २७, पोस्टर ९२५, होर्डिंग ६९८, बॅनर ४,८७३ अन्य १,३९० अशा एकूण ७,६५१ कारवाया करण्यात आल्या.  खासगी मालमत्तेमध्ये भिंत खराब करणे १४४, पोस्टर ३६, होर्डिंग ६, बॅनर ७७, झेंडे १०५, अन्य ४४२ अशा एकूण ३६८ करण्यात आल्या आहेत.  तिन्ही ठिकाणी मिळून आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी  ८,३२६ कारवाया करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT