मुंबई

२२१ प्यालाप्रेमी चालकांवर गुन्हा

CD

२२१ प्यालाप्रेमी चालकांवर गुन्हा
वाहतूक नियम मोडणाऱ्या १३,७५२ वाहनांवर कारवाई
मुंबई, ता. १ ः मद्याच्या नशेत नववर्षाचे स्वागत करणाऱ्या प्यालाप्रेमींची झिंग उतरवत पोलिसांनी २२१ गुन्हे नोंदवले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३,७५२ वाहनांना १.३१ कोटींचा दंड ठोठावला.
जनजागृती, धडक कारवाईनंतरही नववर्षाच्या स्वागतादरम्यान दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या अतिउत्साही चालकांना पकडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात ३१ डिसेंबरला संध्याकाळपासून विविध ठिकाणी नाकाबंदी लावली होती. त्यात २२१ वाहनचालक दारूच्या नशेत सापडले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालवण्यापासून अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक, अवैध पार्किंग, आसन पट्टा असे वाहतुकीचे विविध नियम मोडणाऱ्या १३,७५२ वाहनांना १.३१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा, आपल्या सहकार्यामुळे शहरातील रस्ते, रहदारी अधिक सुरक्षित आणि सहज सुलभ होईल, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT