मुंबई

उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे अनिवार्य – गजानन बेल्लाळे

CD

दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे उमेदवारांना अनिवार्य

मुंबई, ता. १ : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचे सहाय्यक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी सांगितले. निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभागनिहाय निवडणूक खर्च संनियंत्रण पथके गठित करण्यात आली असून, या पथकांच्या बैठकीचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी (ता. १) घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीला प्रमुख लेखापाल (वित्त) वैशाली देसाई, वित्तीय सल्लागार श्रीमती चारुलेखा खोत आणि विविध प्रशासकीय विभागांचे लेखाधिकारी उपस्थित होते. बैठकीत उमेदवारांच्या प्रचार खर्चाचे परीक्षण, निवडणूक आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. खर्च निरीक्षक, लेखा पथके, भरारी आणि व्हिडिओ पाळत पथकांच्या कार्यपद्धतीचाही आढावा घेण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाच्या १५ फेब्रुवारी २०२४च्या आदेशानुसार उमेदवारांनी सर्व निवडणूक खर्च स्वतंत्र बँक खात्यातून करणे आवश्यक आहे. मिळालेल्या निधी, देणग्या आणि स्वनिधीविषयी माहिती नमुना क्रमांक १ व २ मध्ये, तर निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्रासह नमुना क्रमांक ३ मध्ये सादर करणे बंधनकारक आहे. खर्चाचा अहवाल सादर झाल्यानंतर उमेदवारास पोहोच नमुना क्रमांक ४ नुसार दिली जाईल. सर्व दस्तऐवज व्यवस्थित जतन करावेत, असेही बेल्लाळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT