मुंबई

वैभव ठाकरचा जामीन फेटाळला

CD

वैभव ठाकरचा जामीन फेटाळला

मुंबई, ता. १ : मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक, वरिष्ठ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून शहरातील दोन व्यापाऱ्यांना एकूण साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्या वैभव ठाकरचा जामीन अर्ज दंडाधिकारी न्यायालयाने नुकताच फेटाळला.
वैभवचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. अद्याप फसवणुकीची रक्कम, दागिने हस्तगत झालेले नाहीत. या टप्प्यावर मोकळे सोडल्यास वैभव तक्रारदार, साक्षीदारांवर दबाव आणू शकतो आणि मुद्देमाल दडवू शकतो, हा पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्या. सुभाष फुले यांनी हे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रथम वर्ग अधिकारी असल्याचे भासवून वैभव, त्याची पत्नीने सराफा व्यावसायिक शैलेश जैन यांना २.८० कोटींना, तर सांताक्रूझ येथील जनरल स्टोअर चालक अल्पेश जैन यांना ७४ लाख रुपयांना फसवले. अल्पेश यांच्या प्रकरणात वैभवने पत्नी प्रियांका आयपीएस अधिकारी असून, मुंबईत उपआयुक्त असल्याचे भासवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT