मुंबई

थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री डॉकयार्ड रोड परिसरात भीषण आग; कापसाचे गोडाऊन खाक:

CD

डॉकयार्ड रोड परिसरात भीषण आग
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील डॉकयार्ड रोड रेल्वेस्थानकाजवळील एका कापसाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री ११:५३च्या सुमारास ही आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने याला लेव्हल-२ची आग म्हणून घोषित केले आहे.
डॉकयार्ड रोड रेल्वेस्थानकाजवळ, पी. डी''मेलो रोडवरील वाडीबंदर परिसरातील कॉटन प्रेस वेअरहाऊसमध्ये ही आग लागली. कापसाचा मोठा साठा असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच सुरुवातीला ही लेव्हल-१ची आग असल्याचे सांगण्यात आले.
आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या मोहिमेत अग्निशमन दलासह मुंबई पोलिस आणि वॉर्ड स्टाफ, बेस्ट, बीपीटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि १०८ रुग्णवाहिका सेवादेखील घटनास्थळी तैनात होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT