‘एसटी’चे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर सेवानिवृत्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी ३१ डिसेंबरला निवृत्त झाले. कोलारकर हे आगार व्यवस्थापक म्हणून महामंडळात रुजू झाले. त्यानंतर विविध पदांवर काम केल्यानंतर आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर महाव्यवस्थापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून कोलारकर यांची ओळख आहे. महाव्यवस्थापक पदाच्या काळात त्यांनी महामंडळात अनेक धाडसी निर्णय घेतले. डिझेलवरील ७०० जुन्या गाड्या एलएनजी तसेच सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात आल्या. गेल्या वर्षी २,६४० नवीन गाड्या घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे ३,००० गाड्यांची निविदा प्रक्रिया काढण्यात आली असून ५,००० नवीन गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आपल्या महाव्यवस्थापकपदाच्या काळात एसटीच्या ताफ्यात १० हजार ६४० नवीन गाड्या आणण्यात कोलारकर यांचा मोलाचा वाटा होता. याशिवाय ७०० शिवशाही बसचे निमआराम व साध्या गाड्यांमध्ये रूपांतर करण्याची कामगिरीसुद्धा त्यांनी पार पाडली. इंधन बचत करण्यासाठीसुद्धा त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्यासोबत याच विभागातील मुख्य यंत्र अभियंता चालन सुनील वाघचौडे हेसुद्धा महामंडळाच्या ३५ वर्षांच्या सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. या दोघांचाही यशस्वी सेवानिवृत्तीनिमित्त महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सत्कार केला. या वेळी संघटनेचे पदाधिकारी संतोष गायकवाड, सोमनाथ मांढरे, साक्षी कलमकर आणि सिद्धिका चौलकर हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.