प्रदूषण परवानग्यांच्या कटकटीतून सुटका
८५० उद्योगांचा विशेष वर्गात समावेश
सकाळ वृत्तासेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील तब्बल ८५० औद्योगिक आस्थापनांचा आता ‘पांढऱ्या’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्योगांना प्रदूषणमुक्त श्रेणीत स्थान देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे गृह, कुटीर व लघुउद्योगांना मोठी उभारी मिळणार आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उद्योगांचे वर्गीकरण लाल, नारिंगी, हिरवे आणि पांढऱ्या श्रेणीत केले जाते. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय स्तरावर केवळ ५४ उद्योग या श्रेणीत होते. महाराष्ट्राने आधी ही संख्या २२२पर्यंत नेली आणि आता ती थेट ८५०वर पोहोचवली आहे. या उद्योगांना नोंदणीसाठी केवळ एका पानाचा अर्ज करावा लागेल आणि तो सादर केल्यावर तत्काळ ऑनलाइन परवानगी मिळेल. या ८५० प्रकारच्या उद्योगांकडून कोणतेही पर्यावरणीय शुल्क आकारले जाणार नाही. या श्रेणीतील उद्योगांना स्थापनेसाठी एकदा अर्ज केल्यावर कायमस्वरूपी अनुमती मिळणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पर्यावरणस्नेही धोरणाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही कौतुक केले असून, महाराष्ट्राचा हा पॅटर्न आता देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
...
यांना दिलासा
या निर्णयामुळे घरगुती स्तरावर चालणाऱ्या लघुउद्योगांना मोठा फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने हॅन्डमेड ज्वेलरी मेकिंग, अगरबत्ती व धूपनिर्मिती, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स जुळणी (टीव्ही, संगणक, टेप रेकॉर्डर), पापड उद्योग, मसाला ब्लेंडिंग, पिठाची गिरणी (फ्लोअर मिल), केमिकल प्रक्रियाविरहित चर्मोद्योग व फूटवेअर, सुकी मासळी प्रक्रिया केंद्र आणि सिमेंट पाईप निर्मिती यांचा समावेश आहे.
...
अर्थव्यवस्थेला गती!
या निर्णयावर बोलताना मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले, ‘‘या निर्णयामुळे शहरांसोबतच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. कुटीर आणि लघुउद्योगांना चालना देऊन ग्रामीण विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.’’ मंडळाचे सदस्य सचिव देवेंदर सिंह म्हणाले, ‘‘पर्यावरणविषयक परवानग्यांसाठी आता उद्योगांना वाट पाहावी लागणार नाही. आम्ही पूर्णपणे संगणकीय आणि सुलभ कामकाज पद्धती अमलात आणली आहे. यामुळे राज्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, याचा आम्हाला आनंद आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.