मुंबई

आचारसंहितेचा कडक बडगा

CD

आचारसंहितेचा कडक बडगा
बेकायदा प्रचार साहित्यावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेची मुंबईत कडक अंमलबजावणी सुरू आहे. गेल्या १५ दिवसांत (१६ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६) महापालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांवरील विद्रुपीकरण रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली असून, एकूण ७,६५१ बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेचे परवाना अधिकारी अनिल काटे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना लावण्यात आलेल्या राजकीय साहित्यावर महापालिकेने सर्वाधिक कारवाई केली आहे. याप्रकरणी एकूण १,३९० गुन्हे किंवा प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या अहवालानुसार १६ ते २० डिसेंबर या कालावधीत कारवाईचा वेग सर्वाधिक होता. १६ डिसेंबरला एकाच दिवसात ३,७५० हून अधिक बेकायदा फलक हटवण्यात आले. त्यानंतर २१ डिसेंबरपासून राजकीय पक्षांकडून स्वयंशिस्त पाळण्यात आल्याचे दिसून येते. केवळ सार्वजनिकच नव्हे, तर खासगी इमारती आणि भिंतींवर विनापरवाना लावलेल्या ३६८ बेकायदा प्रचार साहित्यावरही प्रशासनाने कारवाई केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खासगी जागांवरील पोस्टर्स आणि बॅनर्सचा समावेश आहे.

प्रशासनाचा इशारा
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी आधीच दिले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

SCROLL FOR NEXT