मुंबई

उमेदवारांना विजयाचा मंत्र

CD

उमेदवारांना विजयाचा मंत्र
शिवसेना भवनात आदित्य, अमित यांनी दिले रणनीतीचे धडे

सकाळ वृत्तासेवा
मुंबई, ता. २ : दादर येथील शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसमोर संयुक्त प्रेझेंटेशन दिले. तरुण नेतृत्वाच्या या युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, मुंबईच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या बैठकीत आदित्य आणि अमित ठाकरे यांनी उमेदवारांना ‘व्हिज्युअल प्रेझेंटेशन’च्या माध्यमातून निवडणुकीच्या रणनीतीचे धडे दिले. यामध्ये प्रामुख्याने विजयाच्या दिशेने नेणाऱ्या मुद्द्यांवर भर देण्यात आला. त्यात वॉर्डनिहाय नियोजन, प्रत्येक वॉर्डातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांची आकडेवारी मांडण्यात आली. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून मतदारांपर्यंत कसे पोहोचायचे, याचे तंत्र सांगण्यात आले. तसेच मुंबईतील नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यात आले. शिवसेना भवनातील या बैठकीत केवळ राजकीय डावपेचच नव्हे, तर मुंबईच्या भविष्यातील विकासाचा आराखडाही मांडण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांतील प्रकल्पांची माहिती दिली, तर अमित ठाकरे यांनी प्रशासकीय पारदर्शकता आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणावर जोर दिला. दोन्ही युवा नेत्यांना एकत्र पाहून उपस्थित उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ‘दोन ठाकरेंनी एकत्रितपणे मार्गदर्शन करणे, हे आमच्यासाठी बळ देणारे आहे,’ अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने व्यक्त केली.
...
ताकद पणाला
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे हे एकत्रित प्रेझेंटेशन भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी मानली जात आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी दोन्ही युवा नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT