मुंबई

रिपाइं १३ जागा स्वबळावर लढणार

CD

रिपाइं १३ जागा स्वबळावर लढणार
इतरत्र युतीला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २ : कधीकाळी मुंबई पालिकेत महापौर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला महायुतीतून एकही जागा सोडण्यात आलेली नाही. रिपाइंकडून १३ जागा स्वबळावर लढविण्यात येत आहेत; मात्र उर्वरित जागांवर भाजपला पाठिंबा देण्यात आला आहे.
मुंबईत दलित मतांवर प्रभाव राखून असलेल्या रामदास आठवले यांना जागावाटपात महायुतीकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आठवले यांनी स्वबळाचा नारा देत ३९ उमेदवार उभे केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि आठवले यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भाजप सहा, तर शिवसेना आपल्या कोट्यातून रिपाइंला सहा जागा सोडेल, उर्वरित पाच जागांवर रिपाइं मैत्रीपूर्ण लढत देईल, असे ठरले; मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते आश्वासनदेखील कागदावर राहिल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात भाजपने एकही जागा सोडली नाही. ३० जागांवर रिपाइंच्या उमेदवारांनी अर्ज भरले, त्यामध्ये १७ अर्ज  माघारी घेण्यासाठी भाजपने दबाव आणला. शेवटी आठवले यांच्या आदेशानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली. त्यामुळे मुंबईत आता रिपाइंचे १३ जागांवर उमेदवार असतील; पण त्याला भाजप आणि शिवसेनाला पाठिंबा असणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT