मुंबई

मालमत्ता करमाफी हा आमचा प्रस्ताव

CD

मालमत्ता करमाफी हा आमचा प्रस्ताव

७०० चौरस फूट घरांच्या प्रस्तावावरून आशीष शेलार यांचे प्रत्युत्तर

मुंबई, ता. ३ : मुंबईतील ७०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा प्रस्ताव आम्ही दिला होता. उद्धव ठाकरे शिवसेनेने फक्त ५०० चौरस फुटांचा प्रस्ताव दिला होता, असे प्रत्युत्तर भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहे.

मुंबईत ५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना आम्ही मालमत्ता करमाफी दिली होती, असा उल्लेख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात आहे. त्याला आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेतील स्थायी समितीत शिवसेना ठाकरे गटाने ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा प्रस्ताव मांडला. त्या वेळी भाजप नगरसेवकांनी ७०० चौरस फुटांना करमाफीची मागणी केली होती. त्याला पालिका आयुक्तांनी सहमती दर्शवूनही ५०० चौरस फुटांचा प्रस्ताव ठाकरे गटाने राज्य सरकारकडे पाठवला. त्यामुळे विधानसभेत मी स्वतः मुद्दा मांडून ७०० ते ७५० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळावी, असा प्रस्ताव पालिकेकडून घेण्याची मागणी सरकारकडे केली होती. तरीही तसा प्रस्ताव पाठवला गेला नाही. अशा स्थितीत आमच्या मागण्या चोरून वचननामा काढू नका. तो अपचननामा होईल, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT