मुंबई

३१.६७ कोटींचा हुक्का जप्त

CD

३१.६७ कोटींचा हुक्का जप्त
‘एफडीए’ची पुण्यात मोठी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिबंधित वस्तूंवर कारवाईसाठी कठोर आदेश दिल्यानंतर आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की, नाही याचा आढावा घेतला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादनाविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ही कारवाई शुक्रवारी (ता. २) करण्यात आली. यापूर्वी १ डिसेंबर २०२५ला या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, या नमुन्यांमध्ये निकोटिन चाचणी सकारात्मक आढळली. या कारवाईत ​एकूण किंमत ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये रुपयांचे विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अनिलकुमार चौहान, संचालक असिफ फाजलानी, फैजल फाजलानी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

..
मोठी साखळी उद्ध्वस्त
​ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे ३१ डिसेंबरला झालेल्या १९.४५ कोटींच्या कारवाईचा धागा पकडून पुणे एफडीएने ही मोठी साखळी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईमुळे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का माफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


मध्य प्रदेशातून तस्करी
जळगाव जामोद महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या तपासणी नाक्यावर वन विभागाने मोठी कारवाई करीत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरीत्या आणला जाणारा तब्बल ७५ लाख रुपये किमतीचा विमल गुटखा व पान मसाला जप्त केला. राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करीत कायद्याचे कोणीही उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Harish Rana Euthanasia: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालं होतं? इच्छामरण म्हणजे काय? भारतात कायदा काय सांगतो अन् कोणते देश मान्यता देतात?

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT