मुंबई

आज वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी;

CD

वर्षातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आज
मंदिरे सजली, भाविकांसाठी गर्दीचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : नव्या वर्षातील २०२६ मधील पहिली संकष्ट चतुर्थी मंगळवारी (ता. ६) अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी होत आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्याने या व्रताला विशेष महत्त्व असून, मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे.
माघ कृष्ण चतुर्थीची तिथी ६ आणि ७ जानेवारी अशा दोन दिवसांवर येत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता; मात्र चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी तिथी असल्यामुळे मंगळवारीच संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे योग्य असल्याचे पंचांगानुसार स्पष्ट करण्यात आले आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, प्रीती योग आणि आयुष्मान योग असे तीन शुभ योग जुळून येत असून, आश्लेषा नक्षत्राचाही संयोग आहे; मात्र सकाळी काही काळ भद्रेचा सायाही असल्याने त्या वेळेत कोणतेही शुभ कार्य टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भाविक सकाळी गणेशपूजा करून उपवास करतात आणि चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देऊन व्रताचे पारण करतात. संततीसुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी हे व्रत केले जाते, अशी श्रद्धा आहे. यामुळे दिवसभर मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार असून, सायंकाळी चंद्रदर्शनाच्या वेळी गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरे फुलांच्या सजावटीने खुलली

अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख गणपती मंदिरे फुलांच्या सजावटीने खुलली असून, विशेष पूजा, आरती आणि चंद्रपूजेची तयारी करण्यात आली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी रांगा, वेळापत्रक आणि स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या असून, गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT