मुंबई

कामा रुग्णालयात लवकरच ‘वन स्टॉप सेंटर’

CD

पीडित महिलांना एका छताखाली मदत
कामा रुग्णालयात लवकरच ‘वन स्टॉप सेंटर’

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात ‘वन स्टॉप सेंटर’ सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हिंसा, शोषण किंवा संकटाला सामोऱ्या जाणाऱ्या महिलांना या केंद्रामार्फत तातडीची, सुरक्षित आणि सर्वंकष मदत दिली जाणार आहे. या केंद्रासाठी रुग्णालयात पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
वन स्टॉप  सेंटर महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत येत असून केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्प आहे. कामा रुग्णालयासारख्या महिला रुग्णालयात हे केंद्र सुरू झाल्याने पीडित महिलांना वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसोपचार सहाय्य एका छताखाली मिळणार असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागणार नाही. केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून, पालिका निवडणुकीनंतर ते सुरू केले जाणार आहे, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
देशभरात १५० वन स्टॉप  सेंटर सुरू करण्याची केंद्र सरकारची याेजना आहे.  कामा रुग्णालयाला १५ जणांच्या समितीने भेट दिली होती. त्यानंतर या केंद्रासाठी लागणारी जागा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच काम सुरू होईल, अशी माहितीही डॉ. तुषार पालवे यांनी दिली.


या सुविधा मिळणार
महिला व १८ वर्षांखालील हिंसा झालेल्या बालकांना वन स्टाॅप सेंटरमध्ये आपत्कालीन व आवश्यक वैद्यकीय उपचार, फॉरेन्सिक तपासणी, मानसिक समुपदेशन, पोलिस मदत, कायदेशीर सल्ला, केस मॅनेजमेंट तसेच गरज भासल्यास तात्पुरत्या निवाऱ्याची सोय उपलब्ध असेल. २४ तास सहाय्य व्यवस्थेमुळे पीडित महिलेला तत्काळ संरक्षण व मार्गदर्शन मिळेल. सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशिक्षित कर्मचारी संपूर्ण प्रक्रियेत पीडितेसोबत राहून मदत करतील.

योजनेची सुरुवात कधी?
- वन स्टॉप सेंटर योजना केंद्र सरकारने २०१५ मध्ये ‘निर्भया फंड’अंतर्गत सुरू केली.
- देशभरातील विविध जिल्हा आणि मोठ्या शासकीय रुग्णालयांत केंद्र स्थापन केली जात आहेत.
- राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे ३६  वन स्टॉप  सेंटर असून मुंबईत एक अतिरिक्त केंद्राचा प्रस्ताव आहे.
..................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT