मुंबई

बिनविरोध विजयाची चौकशी करा

CD

बिनविरोध विजयाची चौकशी करा
मनसे नेते अविनाश जाधव यांची उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईसह राज्यभरात २९ महापालिकांच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविराेध निवडून आले. याविराेधात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सोमवारी (ता. ५) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या बिनविराेध निवडणुकांची चाैकशी करण्याची मागणी केली आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. उमेदवारांना जबरदस्ती आणि प्रलोभन दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. या सर्वांची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बिनविरोध विजयाचा दावा केलेल्या ६८ जागांवरील निकाल जाहीर करण्यास स्थगिती देण्याची मुख्य मागणीही केली आहे.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसाठी किमान मतांच्या अनिवार्यतेबाबत विशिष्ट तरतूद करण्यासाठी कायदा तयार करण्याचे आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मध्ये सुधारणा करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश देण्याची मागणीही याचिकेत केली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या गंभीर आरोपांची राज्य निवडणूक आयोगानेही दखल घेतली आहे. २९ महापालिकांत बिनविरोध विजयी घोषित झालेल्या सुमारे ६९ ते ७० उमेदवारांची राज्यव्यापी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
----
२० टक्के उमेदवारांची माघार!
राज्यभरातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवार बिनविराेध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २ जानेवारीला ४५३ म्हणजेच २० टक्के उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT