मुंबई

वांद्र्यात शिवसेना उमेदवारावर चाकूहल्ला

CD

वांद्र्यात शिवसेना उमेदवारावर चाकूहल्ला

मुंबई, ता. ७ : वांद्रे पश्चिमेतील संत ज्ञानेश्वर नगरात शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार हाजी सालिम कुरेशी यांच्यावर बुधवारी (ता. ७) अनाेळखी व्यक्तींनी प्राणघात चाकूहल्ला केला. यात कुरेशी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुरेशी प्रचार करत असताना हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, पोलिस पथके या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस उपआयुक्त मनीष कालवानिया यांनी दिली.

कुरेशी प्रभाग क्रमांक ९२मधून शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. संध्याकाळी ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत ज्ञानेश्वर नगर येथे प्रचार करत हाेते. त्या वेळी अचानक अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूहल्ला केला. हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित होता की वैयक्तिक वादातून झाला, याचा तपास पोलिस करत आहेत. जखमी कुरेशी यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT