मुंबई

उद्धव ठाकरे यांनी एक विकासकाम सांगावे

CD

ठाकरेंचे विकासकाम दाखवा;
तीन हजार मिळवा : फडणवीस
मुंबई, ता. ९ : उद्धव ठाकरेंनी गेल्या २५ वर्षांत मुंबईत केलेले एक विकासकाम सांगावे, मी त्यांना तीन हजार रुपये देईन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अंधेरी येथील महायुतीच्या प्रचार सभेत ते शुक्रवारी (ता. ९) बोलत होते. ‘आम्ही झोपडपट्टीमुक्त मुंबई करणार आहोत, म्हणजेच प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला त्याच्या मालकीचे घर मिळवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत,’ असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की ‘उद्धव ठाकरे आज मराठीबद्दल बोलत आहेत; मात्र त्यांच्या राजवटीत सामान्य मुंबईकर मुंबईतून हद्दपार का झाला, त्यांच्यासाठी तुम्ही काय केले, उलट आम्ही बीडीडी चाळीतील रहिवाशांना पाचशे चौरस फुटांचे घर दिले. पत्राचाळीतील मराठी माणसांना उद्धव सेनेच्या बिल्डरांनी २० वर्षे बेघर केले. त्यांना आता आम्ही तेथेच घर देत आहोत. २० वर्षे रखडलेल्या एसआरए योजनांचे प्रश्नही आम्ही सोडवले. चुकार बिल्डरचे ‘एलओआय’ रद्द करून नवे बिल्डर आम्ही आणले. तर काही एसआरए प्रकल्प महापालिकेने, एमएमआरडीएने प्राधिकरणाने हाती घेतले आहेत,’ असेही ते म्हणाले. ‘मुंबईचे प्रश्न समजून आम्ही काम सुरू केले आहे. मुंबईतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून समुद्रात सोडण्यासाठीचे एसटीपी प्रकल्प पुढच्या वर्षी सुरू होतील व शुद्ध पाणी समुद्रात जाईल, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्वांवर पाच लाख रुपयांपर्यंत विनामूल्य इलाज होईल. तसेच १० आजारांच्या ३५ लाख रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया निःशुल्क होतील. लाडकी बहीण योजना बंद करणार नसून उलट लाडक्या बहिणींना लखपती केले जाईल,’ अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली.

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोड भाईंदरपर्यंत नेला जाईल. गोरेगाव मुलुंड- लिंक रोड, भुयारी केला जाईल व त्यामुळे पुढील काळात मुंबईकर रस्त्यावर अडकून राहणार नाही. ते कमीत कमी वेळात घरी जातील. वन सिंगल पास-तिकिटाच्या माध्यमातून वॉटर टॅक्सीतूनही प्रवास करता येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT