मुंबई

किशोरी पेडणेकरांविरुद्ध किरीट सोमय्यांची तक्रार

CD

किशोरी पेडणेकरांविरुद्ध किरीट सोमय्यांची तक्रार
गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप

मुंबई, ता. ९ ः माजी महापौर आणि शिवसेना उद्धव गटाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आणि आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवली, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकर यांच्याविरुद्ध ऑगस्ट २०२३मध्ये कोविड रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडी बॅग घोटाळ्यातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्यांमध्ये पेडणेकर यांचे नाव आहे. १,६०० रुपयांची ही बॅग ६,७१९ रुपयांना महापालिकेने खरेदी केली. महापालिकेने अशा हजारो बॅगा वेदांत इन्फोटेककडून खरेदी केल्या. याप्रकरणी पेडणेकर यांनी उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीनही घेतला होता, असे सोमय्या यांचे म्हणणे आहे. निर्मलनगर पोलिस ठाण्यातही जानेवारी २०२३मध्ये पेडणेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांनी २०१७च्या निवडणूक अर्जात वरळी गोमाता एसआरएमध्ये राहत असल्याचा पत्ता दिला होता, असे सोमय्या यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. पेडणेकर यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया लिमिटेड विरुद्धही ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही सर्व माहिती पेडणेकर यांनी निवडणूक अर्जात व शपथपत्रात लपवल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Update : आज कुठे काय घडलं? पाहा एका क्लिकवर...

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

SCROLL FOR NEXT