मुंबई

मुंबईत नगरसेवकांचा ‘लेडीज फर्स्ट’ गेम!

CD

आरक्षणाने दिग्गजांवर
‘सौं’च्या प्रचाराची वेळ
१२ माजी नगरसेवकांचे स्वप्न भंगले
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महापालिकेच्या आखाड्यात शड्डू ठोकणाऱ्या अनेक ‘दिग्गज’ नगरसेवकांवर यंदा ‘घरची वारी’ करण्याची वेळ आली आहे. प्रभाग आरक्षणाच्या सोडतीने अनेकांचे स्वप्न भंगले आहे. मुंबईतील किमान १२ प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांनी आता ‘मी नाही तर माझी बायको’ हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज नेत्यांवर ‘सौं’चा प्रचार करण्याची वेळ आली आहे.
प्रभाग क्रमांक १६६ मध्ये संजय तुरडे यांनी मनसेचा झेंडा सोडून शिंदे गटात प्रवेश केला; पण स्वतःसाठी नाही तर पत्नी मीनल तुरडे यांच्यासाठी. अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक सहामधील हर्षद कारकर यांची झाली असून त्यांनी पत्नी दीक्षा कारकर यांना रिंगणात उतरवून आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

आमदारकीनंतर नगरसेवकपदही हवे!
प्रभाग क्रमांक १६३ मधील दिलीप लांडे नुकतेच आमदार झाले. आता महापालिका निवडणुकीत त्यांनी पत्नी शैला लांडे यांना पुढे केले. दुसरीकडे रामदास कांबळे यांचा प्रभाग क्रमांक १७३ महिलांसाठी आरक्षित होताच, त्यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिंदेंचा हात धरला आणि पत्नी पूजा कांबळे यांच्यासाठी तिकीट मिळवून दिले.
---
पूर्वी स्वतःसाठी, आता पत्नीसाठी!
प्रभाग क्र. ९४ मध्ये माजी नगरसेवक राजू हटकर यांना पुन्हा एकदा आरक्षणाचा फटका बसला. त्यांनी पत्नी प्रज्ञा भुतकर यांना मैदानात उतरवले. प्रभाग क्र. १८४ मधून ठाकरे गटाचे वसंत नकाशे यांचा राजकीय नकाशा आरक्षणाने बदलला, त्यामुळे त्यांना पत्नी वर्षा नकाशे यांना पुढे करावे लागले. प्रभाग क्र. १४२ मधून विठ्ठल लोकरे यांनाही आरक्षण धक्क्याने पत्नी सुनीता लोकरे यांचा प्रचार करावा लागत आहे. प्रभाग क्र. १९७ मध्ये दत्ता नरवणकर यांनाही पत्नी वनिता नरवणकर यांच्या नावाने मते मागावी लागत आहेत.

ज्येष्ठांचीही तीच तऱ्हा!
ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या प्रभागासह आजूबाजूचे सात प्रभाग महिला आरक्षित झाले. सातमकर यांचा प्रदीर्घ अनुभव आता पत्नी मानसी सातमकर यांच्या कामाला येणार आहे. काँग्रेसचे कचरू यादव यांनीही आपल्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून पत्नी ललिता यादव यांना संधी दिली आहे. वरळीत आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक मयूर कांबळे यांनाही पत्नी रेखा कांबळे यांच्यासाठी प्रचार करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकबराच्या बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बापही पैदा झाला नव्हता तेव्हा...; कुंभमेळ्यावरून फडणवीस गरजले

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात येतोय शेतात राबणारा काळ्या आईचा पुत्र

माेठी बातमी! शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा ‘व्हायरल; उत्तर सोलापूर, सांगोला वगळून माढा, माळशिरसमधून जाणार !

Latest Marathi News Live Update : पिंपळनेरकडे येणाऱ्या अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्कची धडक; ७१.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाजपकडून पैशांच्या पाकिटांचं वाटप, शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडलं; VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT