मुंबई

गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा : प्रकाश महाजन

CD

गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा : प्रकाश महाजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : ‘महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळण्याचे पथ्य पाळायला हवे होते; मात्र भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. नाईक यांच्या कुवतीनुसार मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद दिले असून त्यांनी आता वानप्रस्थाश्रम स्वीकारावा,’ असा टोला शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी लगावला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते शनिवारी (ता. १०) बोलत होते.

महाजन म्हणाले, की ‘नाईक यांचे वय वाढले आहे. नाईक हे आता फक्त ऐरोलीपुरते नेते राहिले आहेत. बेलापूर विधानसभा नाईक यांच्या हातून गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांना वन खाते विचारपूर्वक दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका आणि बेताल बडबड करण्यापेक्षा नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या शांत आणि सुसंस्कृत नेत्यावर टीका करणे नाईक यांना शोभत नाही,’ असे महाजन म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. त्यासाठी लाडकी बहीण योजना लागू केली. राज ठाकरेंसाठी १,५०० रुपये खूपच छोटी रक्कम असेल. त्यांच्याकडील एका एका कुत्र्याचा दिवसाचा खर्च १,५०० रुपये असू शकतो; मात्र गरीब लाडक्या बहिणीला ही खूप मोठी मदत आहे. उशिरा का होईना राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेचे अप्रत्यक्ष कौतुक केले,’ असे महाजन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT