मुंबई

पालिकेच्या रणांगणात ‘कोट्यधीशांचा’ सामना

CD

पालिकेच्या रणांगणात ‘कोट्यधीशां’चा सामना
मकरंद नार्वेकर, चंदन शर्मा सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा कोट्यधीश उमेदवारांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक श्रीमंत उमेदवार महायुतीचे असून, त्याखालोखाल शिवसेना ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर हे मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे तब्बल १२४.४ कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्याच्यापाठोपाठ भाजपचे उमेदवार चंदन शर्मा यांच्याकडे ८४ कोटींची संपत्ती आहे. महिलांमध्ये सपाच्या उमेदवार सना कुरेशी या सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरल्या.
कुलाब्यातील प्रभाग क्रमांक २२६ मधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणारे भाजपचे मकरंद नार्वेकर हे पालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे १२४ कोटींची मालमत्ता आहे. त्यात ३२.१४ कोटी जंगम, तर ९२.३२ कोटी स्थावर मालमत्ता आहे. नऊ वर्षांत त्यांची संपत्ती चौपट झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंदन शर्मा आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. शर्मा हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांची एकूण संपत्ती ८४ कोटी आहे. २०१७मध्ये शर्मा यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांची संपत्ती १८ कोटी होती.
----
सना कुरेशी श्रीमंत महिला
महिला उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक ९० मधून समाजवादी पक्षातर्फे लढणाऱ्या सना कुरेशी यांच्याकडे तब्बल ६०.३३ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून रिंगणात उतरलेल्या ॲड. ट्युलिप मिरांडा यांची संपत्ती ५०.६९ कोटींची, तर शिवसेनेच्या उमेदवार मीनल तुरडे यांच्याकडे ५५ कोटींची मालमत्ता आहे.
----
सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
उमेदवार (पक्ष) संपत्ती
मकरंद नार्वेकर (भाजप) १२४ कोटी
सना कुरेशी (सप) ६० कोटी
मीनल तुरडे (शिवसेना) ५५.१७ कोटी
ॲड. ट्युलिप मिरांडा (काँग्रेस) ५०.६९ कोटी
शेख हुसेन (काँग्रेस) ४३.१८ कोटी
अनिता वैती (भाजप) २८.८८ कोटी
सुहास आडिवरेकर (भाजप) २१.२८ कोटी
प्रकाश गंगाधरे (भाजप) १२.८८ कोटी
दीपमाला बढे (ठाकरे) १०.७७ कोटी
नील सोमय्या (भाजप) ९.८९ कोटी
-----
१० कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे उमेदवार
चौथीप्रसाद गुप्ता २४.५६ कोटी
संध्या दोषी १९.२६ कोटी
जिग्नासा शाह १७.८५ कोटी
संजय भोसले १३.१० कोटी
सुजाता पाटेक १२.१४ कोटी
शिल्पा सांगोरे १२.८३ कोटी
प्रीती दांडेकर ११.३३ कोटी
मिलिंद वैद्य १३.३९ कोटी
रवि राजा १०.१२ कोटी
----
शून्य संपत्ती असलेलेही उमेदवार
एकीकडे कोट्यवधींची संपत्ती असलेले बलाढ्य उमेदवार रिंगणात उतरले असताना, दुसरीकडे काही उमेदवारांची संपत्ती शून्य असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सोनू जैन, महेश आचारी, जाहिदा शेख, फलक कुरेशी, राजेश जाधव, शहाजी थोरात, रश्मी शिंदे यांची शून्य संपत्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Book Festival Poor Response: लाखोंचा खर्च, पण वाचक गायब; जालना ग्रंथोत्सवाकडे साहित्यप्रेमींची पाठ;पुस्तक प्रदर्शनात दिवसभर वाचकच नाहीत

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...

T20 World Cup नंतरही भारतात अडकलेले वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेचे अखेर मायदेशी परतणार; ICC कडून तिकीटांची सोय

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe: मेळघाटातील सेवाकार्यासाठी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना परभणीत दर्पण पुरस्कार

SCROLL FOR NEXT