मुंबई

लाडक्या बहिणींना पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज

CD

लाडक्या बहिणींना पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज

महायुतीचा वचननामा जाहीर; आराेग्य, पायाभूत सुविधांवर भर
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्या महायुतीने रविवारी वचननामा प्रसिद्ध केला. लाडक्या बहिणींना महापालिकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज, ‘बेस्ट’मध्ये लाडक्या बहिणींना तिकीटदरात ५० टक्के सवलत, महापालिका सफाई कामगारांना मालकी हक्काचे मुंबईत घर, महापालिकेच्या रुग्णालयात दोन हजार जादा खाटा, मुंबईला पहिल्या टप्प्यात जादा ५०० एमएलडी पाणी इत्यादी आश्वासने या वचननाम्यात देण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री आशीष शेलार, योगेश कदम आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आला. यासाठी मुंबईकरांनी दिलेल्या दोन लाख ६५ हजार सूचनांच्या आधारे हा वचननामा तयार करण्यात आला. १६ जानेवारीनंतर मुंबईचा चेहरामाेहरा बदलण्यास सुरू होईल आणि पाच वर्षांत मुंबई जागतिक दर्जाचे शहर होईल. साडेतीन वर्षे आम्ही काम केले; पण विकासाचा हा वेग वाढवायचा आहे, असे एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले.

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणू, मुंबई पागडीमुक्त करून त्या इमारतींचा पुनर्विकास करू, घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरात झाेपडपट्टी पुनर्विकास याेजना आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून १७ हजार घरे तयार होतील, असे १७ क्लस्टर आम्ही मुंबईत तयार करत आहोत. आतापर्यंत १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली असून अजून सव्वा लाख गिरणी कामगारांना घरे देऊ, सर्वांसाठी घर या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुंबई ३० ते ३५ लाख घरांची निर्मिती करू, पाच वर्षांत मुंबईला ‘फिनटेक कॅपिटल’ करू, इंटरनॅशनल फायनान्स सेंटर मुंबईतच स्थापन करू, कोळीवाडे आणि गावठाण यांचा वेगळा डीसीआर तयार केला जाईल, असे शिंदे यांनी या वेळी सांगितले.
म्हाडाच्या लेआऊट जागांचा पुनर्विकास करताना आता विकसक म्हाडाच असेल, इमारती बांधायला बिल्डर नेमला जाईल, जमीन मालकी म्हाडाचीच असेल, ती विकली जाणार नाही. धारावीच्या पुनर्विकासात अपात्र व्यक्तींना उच्च न्यायालयाच्या आदेशातून मार्ग काढून घरे दिली जातील, महापालिका सफाई कामगारांनाही मुंबईत मालकी हक्काने घरे मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

-----

वचननाम्यातील अन्य वचने
- महापालिका शाळा आधुनिक कौशल्ययुक्त करणार
- बेस्ट बसच्या ताफ्यात आणखी पाच ते सात हजार बसची भर
- महापालिकेच्या कारभारात मानवी हस्तक्षेप कमी करून पारदर्शकतेसाठी योजना
- मराठी शिकवण्यासाठी भाषा प्रयोगशाळा करणार
- महापालिका रुग्णालयात ज्यादा दोन हजार खाटा देणार
- मुंबईत उच्च वेतनश्रेणीचे रोजगार निर्माण करणार
- २०६० पर्यंतच्या मुंबईच्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी मिळवणार
- डम्पिंग ग्राउंड बंद करून झीरो गार्बेज प्लॅन करणार
- कचऱ्यापासून गॅसनिर्मिती आणि वीजनिर्मिती प्रकल्प करणार
- मुंबईतील बेस्ट बसची संख्या ५,००० वरून १२ हजारांपर्यंत नेणार
- मुंबई परिसरात २०० नॉटिकल मैलांची वॉटर ट्रान्स्पोर्ट व्यवस्था करणार व त्यासाठी वॉटर टॅक्सी आणि २१ जेट्टी तयार करणार
- नवी मुंबई विमानतळ ते गेटवे वॉटर टॅक्सी करणार
- मुंबई २०० नॉटिकल मैल लांबीच्या वॉटर ट्रान्स्पोर्ट सेवा
- ईस्टर्न फ्री-वे घाटकोपर ते ठाण्यापर्यंत नेणार
- शिवडी वरळी पूल यावर्षी पूर्ण करणार
- मुंबईच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणानंतर ४० वर्षे त्यावर खड्डे पडणार नाहीत याची खात्री देणार
- बांगलादेशींना शोधण्यासाठी आयआयटीच्या मदतीने एआय टूल
- महापालिका कारभारात पारदर्शकता आणि वाढीव खर्चावर नियंत्रणासाठी योजना आणणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT