मुंबई

दोन प्रभागांत महायुतीचे चार उमेदवार आमने-सामने

CD

दोन प्रभागांत महायुतीचे चार उमेदवार आमनेसामने

मुंबई, ता. ११ : बंडखोरी थोपवण्यात आलेले अपयश तसेच पक्षांतर्गत कारवाई न झाल्याने शहरातील काही प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) अशी थेट लढत अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, यातील दोन प्रभागांमध्ये महायुतीचे तब्बल चार उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपने दोन दिवसांपूर्वी २६ बंडखोर उमेदवारांविरोधात निलंबनाची कारवाई केली; मात्र शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना मात्र अभय दिले. त्यामुळे विक्रोळीतील प्रभाग क्रमांक ११९ आणि भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११३मध्ये अधिकृत आणि महायुतीचे तीन बंडखोर असे चार उमेदवार रिंगणात असल्याचे चित्र आहे. यामध्ये प्रभाग ११९ मध्ये महायुतीतर्फे शिंदे गटाचे राजेंद्र सोनवळे अधिकृत उमेदवार आहेत; मात्र त्यांच्यासमोर त्यांच्याच पक्षाचे शाखाप्रमुख संदीप खरात, भाजपच्या वॉर्ड अध्यक्षा श्रुती घोगळे आणि भाजप कार्यकर्त्या चंद्रिका पांडे यांनी दंड थोपटले आहेत. तर प्रभाग क्रमांक ११३ मध्ये शिंदे गटाचे आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रूपेश यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात शिंदे गटातील महेश गोळे, सुरेंद्र गावडे तर भाजपचे शैलेंद्र सुवर्णा रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

Dry Fruits Price Hike: बदाम, पिस्ता, खजुर महागले! युद्धजन्य परिस्थितीमुळे सुक्या मेव्याची आवक ठप्प, दरवाढ किती?

Horoscope : उद्या १४ मार्च 'या' ४ राशींसाठी ठरणार गेमचेंजर; शेअर्सची गुंतवणूक देईल लाखोंचा फायदा, करियर अन् वैवाहिक जीवनाला कलाटणी

Palghar Crime : पालघर हादरले! मजुराला झाडाला उलटे टांगून जखमांवर चोळले तिखट, विटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT