मुंबई

प्रचारादरम्यान आतषबाजीत घरांना आग

CD

प्रचारादरम्यान आतषबाजीत घरांना आग

मुंबई, ता. ११ : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रचारादरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसरातील दोन इमारतींतील चार घरांना आग लागल्याची घटना शनिवारी (ता. १०) संध्याकाळी ना. म. जोशी मार्ग येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पेडणेकर यांचे कार्यकर्ते रामचंद्र येसादे, सोहम सरवणकर आणि ओमसाई पानसरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडणेकर यांच्या प्रचारार्थ ना. म. जोशी मार्ग येथे प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रचारासाठी पेडणेकर येथील गोवर्धन इमारतीत गृहभेटीसाठी गेल्या तेव्हा बाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ती थांबवण्यास सांगितले; मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या आतषबाजीमुळे गोवर्धन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एक, तर शेजारील इराणी चाळीतील तीन घरांना आग लागली. ही आग तत्काळ विझवण्यात आली. याप्रकरणी मनाई आदेश धाब्यावर बसवून फटाक्यांची आतषबाजी, ज्वलनशील पदार्थांसोबतची निष्काळजी आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याचे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

Harish Rana Case: इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणांच्या कुटुंबाला योगी सरकारचा मोठा आधार! उत्पन्नासाठी दुकानही देणार

SCROLL FOR NEXT