‘वॉटर-गटर-मीटर’वर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी
मुंबई : ‘मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वसामान्यांच्या ‘वॉटर, गटर आणि मीटर’शी निगडित आहे; आम्ही गेल्या २५ वर्षांत काय काम केले, हे झोपेतून उठून विचारले तरी सांगू शकतो, पण भाजपने केवळ खोटी टीका करण्यापलीकडे काहीही केलेले नाही,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनेने मुंबई महापालिकेचा तुटीचा अर्थसंकल्प नफ्यात आणला. कोणताही अतिरिक्त कर न लावता ९२,००० कोटींच्या ठेवी उभारल्या. या पैशातून आम्ही जात, धर्म न पाहता दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये आणि ट्रामा केअर सेंटर्स उभारले.’
सुरत लुटीचा राग अजूनही कायम : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधताना छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. ‘महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरत लुटली होती, त्याचा राग अजूनही काही जणांच्या मनात आहे. म्हणूनच अण्णामलाई सारखे नेते ‘मुंबई महाराष्ट्राची नाही’ असे बोलायची हिंमत करतात. हे मुंबई तोडण्याचे षडयंत्र आहे,’ असा आरोप त्यांनी केला. पाटील पुढे म्हणाले की, ‘भाजपने प्रचारासाठी राज्याबाहेरून फौज मागवली आहे, पण इथे ठाकरे बंधू मराठी माणसाला सोबत घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मुंबईच्या सत्तेच्या चाव्या आणि मुंबईचा महापौर कोण असेल, हे ठाकरे बंधूच निश्चित करतील.’
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.