मुंबई

२५४ बेघर श्रमिकांना यंदा मतदानाचा अधिकार; पालिकेच्या उपेक्षेवर संताप

CD

२५४ बेघर श्रमिकांना यंदा मतदानाचा अधिकार; पालिकेच्या उपेक्षेवर संताप
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या, स्वतःच्या हक्काच्या छपरापासून वंचित असलेल्या २५४ बेघर श्रमिकांनी यंदा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. ‘सीपीडी’ संस्थेच्या गेल्या दोन वर्षांच्या पाठपुराव्यामुळे, रस्त्याशेजारी आणि नाल्यांच्या काठी राहणाऱ्या या पारधी व भटके विमुक्त समाजातील श्रमिकांची नावनोंदणी मतदार यादीत झाली आहे.
​सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार, महापालिकेने बेघरांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांत मुंबई महापालिकेने या कुटुंबांसाठी कोणतीही ठोस सोय केलेली नाही. उलट, कडाक्याची थंडी किंवा पावसाळ्यातही या श्रमिकांच्या झोपड्यांची मोडतोड करून त्यांना अधिक हतबल केले जाते, अशी खंत व्यक्त होत आहे.
​​सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी पालिकेच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, जगातील श्रीमंत महापालिका पेंग्विन, कबुतरे आणि कुत्र्यांबद्दल संवेदनशीलता दाखवते. मात्र, नालेसफाई आणि रस्तासफाई करून मुंबईची सेवा करणाऱ्या या भारतीय नागरिकांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. यापूर्वी हे श्रमिक मतदार नसल्याने राजकीय पक्षही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. आता ते मतदार झाले आहेत, त्यामुळे किमान आता तरी त्यांना शहराचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळावी.
​मतदानाच्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्या मात्र मतदानाकडे पाठ फिरवणाऱ्या सुशिक्षित वर्गासमोर या श्रमिकांनी आदर्श ठेवला आहे. आम्ही आमचा घटनात्मक अधिकार कोणालाही न विकता बजावणार आहोत, असा ठाम विश्वास कार्यकर्त्या गंगा पवार यांनी व्यक्त केला.

​बेघर मतदार यादी व माहिती :

परिसर / एकूण मतदार / प्रभाग क्रमांक
१. चिकूवाडी, बोरिवली / ६८ / १७
२. एकता गार्डन, बोरिवली / ०८ / १७
३. डॉन बॉस्को, बोरिवली / ०९ / १७
४. एमटीएनएल बोरिवली / १४ / ०८
५. दलानी पार्क, कांदिवली / ४५ / २४
६. ओबेरॉय मॉल, गोरेगाव / ३८ / ५१
७. राना हॉटेल, गोरेगाव / ३६ / ५५
८. विलेपार्ले / ३६ / ७१
......
एकूण २५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Municipal Election 2026 : राजकीय वातावरण तापलं! धुळ्यात शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक, खुर्च्यांची केली तोडफोड; भाजपने हल्ला केल्याचा आरोप

Mumbai Politics: विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली; भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल, काय म्हणाले?

PF Withdrawal via BHIM App: लवकरच ‘BHIM’ अ‍ॅप द्वारेही ‘PF’ काढता येणार!, जाणून घ्या ‘ही’ सुविधा कधी उपलब्ध होणार?

Nagpur Crime : "मुलगी आईकडे देणार नाही"; नागपुरात रागाच्या भरात बापाने चिमुकल्या मुलीचा घेतला जीव!

Pune Holkar Bridge : होळकर पुलावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; धडक देऊन चालक पसार!

SCROLL FOR NEXT