मुंबई

चुरशीच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष

CD

चुरशीच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष
या प्रभागांनी वाढवला मुंबईचा पारा
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : महापालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यंदाची निवडणूक केवळ आकड्यांची नसून अस्तित्वाची आणि वारसा सिद्ध करण्याची लढाई बनली आहे. प्रस्थापित नेत्यांची मुले, नातेवाईक आणि आजी-माजी महापौरांच्या रिंगणात उतरण्याने अनेक प्रभागांत निकराची लढाई पाहायला मिळत आहे.

​वारसदारांची प्रतिष्ठा पणाला; बालेकिल्ल्यातच होणार फैसला!
​प्रभाग ५४ (दिंडोशी) : ठाकरेंचे विश्वासू आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू मैदानात आहेत. त्यांना रोखण्यासाठी भाजपने विप्लव अवसरे यांच्या रूपाने तगडे आव्हान उभे केले असून हा सामना चुरशीचा ठरणार आहे.

​प्रभाग १६९ : आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय कुडाळकर (शिंदे गट) आणि ठाकरे गटाच्या अनुभवी नेत्या प्रवीणा मोरजकर यांच्यात अनुभवाचा कस लागणार आहे.

​प्रभाग २२५ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर विरुद्ध माजी आमदार अशोक धात्रक यांचे पुत्र अजिंक्य धात्रक अशी दोन बड्या राजकीय घराण्यांची ‘हाय-प्रोफाइल’ लढत रंगणार आहे.

​प्रभाग ८९ : माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गितेश राऊत विरुद्ध शिंदे गटाचे राजेश नाईक यांच्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा अटीतटीचा सामना होईल.

​* दोन महापौरांची कसोटी
​मुंबईच्या दोन माजी महापौरांच्या भवितव्याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे.

​प्रभाग १९९ : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासमोर शिंदे गटाच्या रूपाली कुसळे यांनी शड्डू ठोकला आहे. ही लढाई ‘फायरब्रँड’ विरुद्ध ‘कष्टाळू’ अशी रंगणार आहे.

​प्रभाग १९१ : माजी महापौर विशाखा राऊत (ठाकरे गट) आणि आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रीती सरवणकर-गुरव (शिंदे गट) यांच्यात थेट लढत आहे. दादरच्या या ‘शिवतीर्था’वर कोण झेंडा फडकवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

​* बदललेली निष्ठा आणि ‘तिरंगी’ पेच :
​प्रभाग २ : घोसाळकर घराण्यातील तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने, त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचे कडवे आव्हान आहे. ही लढत घोसाळकर घराण्याच्या वर्चस्वासाठी महत्त्वाची आहे.

​प्रभाग १६८ : आमदार नवाब मलिक यांच्या भगिनी डॉ. सईदा खान (एनसीपी) विरुद्ध ठाकरे गटाचे सुधीर खातू असा मुख्य सामना रंगणार असला, तरी भाजपच्या अनुराधा पेडणेकर किती मते घेतात, यावर विजयाची गणिते अवलंबून असतील.

​प्रभाग १९२ : शिवसेना भवनच्या अंगणात यशवंत किल्लेदार (मनसे) विरुद्ध प्रीती पाटणकर (शिंदे गट) असा सामना आहे.

* ​खासदार पुत्रांची अग्निपरीक्षा :
​प्रभाग ३४ : काँग्रेस नेते असलम शेख यांचे पुत्र हैदर असलम शेख विरुद्ध भाजपचे जॉन डेनिस यांच्यात चुरस आहे.

​प्रभाग १०७ : भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या पुन्हा एकदा नशीब अजमावत असून त्यांच्यासमोर वंचितच्या वैशाली सकपाळ यांचे आव्हान आहे. त्यांना इतर पक्षाने पाठिंबा दिला आहे. यामुळे निलसुमय्या यांच्यासमोरचे आव्हान अधिक खडतर झाले आहे.

​प्रभाग ११४ : खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजुल पाटील (ठाकरे गट) विरुद्ध सुप्रिया धुरत (शिंदे गट) यांच्यातील लढतीकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

voting without voter ID : मतदार ओळखपत्र नसले तरीही करता येणार मतदान, जाणून घ्या कसं?

Big Blow: भारताच्या स्टार खेळाडूची IND vs NZ ट्वेंटी-२० मालिकेतूनही माघार; वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Iran Calls India : अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती असताना, इराणने भारताला केला फोन अन्...

MCA: मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय! रोहित - रहाणेसह IPL खेळणाऱ्या खेळाडूंना देणार नाही करार; कारण घ्या जाणून

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT