मुंबई

‘टाटा मुंबई मॅरेथॉन’निमित्त वाहतूकीत बदल

CD

‘टाटा मुंबई मॅरेथॉन’निमित्त वाहतुकीत बदल


​मुंबई, ता. १६ : टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी रविवारी (ता. १८) रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, बेस्ट बसच्या अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर काही मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही ​मॅरेथॉन स्पर्धा पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १:३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. यासाठी स्पर्धेच्या मुख्य मार्गात मुंबई वाहतूक पोलिसांनी लावलेल्या निर्बंधांमुळे या मार्गावरून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचा मुख्य मार्ग सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, मरीन ड्राइव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे वरळी सागरी सेतू (सी-लिंक), माहीम, प्रभादेवी असा आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी लावलेल्या निर्बंधांमुळे, मॅरेथॉन मार्गावरून जाणाऱ्या बसगाड्या आता पर्यायी मार्गाने धावतील. या काळात ​अ-७६, अ-७७, अ-७८, अ-१०५, अ-१०६, अ-१०८, अ-११२, अ-१२३, अ-११८, अ-१३२, अ-१३७ आणि अ-१५५ हे बस मार्ग बंद राहतील, अशी माहिती प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT