मुंबई

दक्षिण मध्य मुंबईचा राजकीय पोत बदलला

CD

दक्षिण मध्य मुंबईचा राजकीय पोत बदलला
ठाकरेंचा गड शाबूत; पण भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १७ : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ३५ महापालिका प्रभागांच्या निकालांनी आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या गणितांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना (ठाकरे) १० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी भाजप (९ जागा) आणि शिवसेना (शिंदे) (८ जागा) यांच्या युतीने या भागात ‘ठाकरे ब्रँड’ला जोरदार टक्कर दिली आहे.

दक्षिण मध्य मुंबईत २०१७/२०२६
भाजप - ७/९ (२ जागा वाढल्या)
शिवसेना - १७/८ (९ जागा घटल्या)
शिवसेना ठाकरे - १७/१० (७ जागा घटल्या)
काँग्रेस - १४/९ (५ जागा घटल्या)
समाजवादी - १/२ (१ जागा वाढली)
एमआयएम - २ जागी खाते उघडले
मनसे - १ जागी खाते उघडले

शिवसेनेचा प्रभाव कायम, जागा घटल्‍या!
अविभाजित शिवसेनेकडे २०१७ मध्ये या पट्ट्यात १७ जागा होत्या. आता दोन्ही शिवसेना मिळून १८ जागा (ठाकरे १०, शिंदे ८) आहेत. तर भाजप आणि शिवसेना शिंदे गट मिळून १७ जागा (भाजप ९, शिंदे ८) याचा अर्थ शिवसेनेचा टक्का कमी झालेला नाही; मात्र सत्तेचे विभाजन झाले आहे. त्याचा दोन्ही शिवसेनेला फटका बसला आहे. विशेषतः धारावी आणि वडाळा, माहीम भागात ठाकरे गटाने आपली पकड कायम ठेवली आहे.

एकतर्फी वर्चस्‍व​
भाजपने सायन कोळीवाडा आणि चेंबूर परिसरात जबरदस्त कामगिरी करत आपल्या जागा सातवरून नऊवर नेल्या आहेत. सायन कोळीवाडा विधानसभेत तर भाजपचे जवळजवळ एकतर्फी वर्चस्व दिसून येत आहे.

काँग्रेसची मोठी घसरण
या निवडणुकीत सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. २०१७ मध्ये नऊ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आता केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. धारावी आणि माहीममधील काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळल्याचे हे निदर्शक आहे.

अणुशक्तीनगरमध्ये नव्या शक्तींचा उदय
अणुशक्तीनगरमध्ये एमआयएमने दोन जागा जिंकून खाते उघडले आहे, तर शिवसेना (शिंदे) गटाने दोन जागा जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. विठ्ठल लोकरे (ठाकरे गट) यांनी आपली जागा वाचवण्यात यश मिळवले आहे.

मनसेचे पुनरागमन
यशवंत किल्लेदार यांच्या विजयाने मनसेने दक्षिण मध्य मुंबईत पुन्हा एकदा शिरकाव केला आहे, जे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकते.

विधानसभानिहाय कल
* माहीम व वडाळा : येथे आजही ठाकरे गटाचे वर्चस्व (एकूण ५ जागा) वरचढ आहे.
* सायन कोळीवाडा : हा भाग आता पूर्णपणे भाजपमय (४ जागा) होताना दिसत आहे.
* चेंबूर : येथे भाजप आणि शिंदे गट यांच्या युतीचे वर्चस्व अधिक आहे.
* अणुशक्तीनगर : येथे काँग्रेस वगळता बाकी पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे.
* धारावी : येथे संमिश्र निकाल असून ठाकरे गट, शिंदे गट, भाजप, काँग्रेस आणि मनसे अशा पाचही पक्षांचे अस्तित्व निर्माण झाले आहे.

महायुती वरचढ
​दक्षिण मध्य मुंबईत खासदार अनिल देसाईंसमोर आता मोठे आव्हान असणार आहे. भाजपने केलेली दोन जागांची वाढ आणि शिंदे गटाने पटकावलेल्या आठ जागांमुळे या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे (१७ जागा) आता महाविकास आघाडीच्या (१५ जागा) बरोबरीने किंवा थोडे वर ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हा, तर वैभव सूर्यवंशीवर वरचढ ठरला! U19 World Cup मध्ये विश्विविक्रम नोंदवला; १९२ धावांची खेळी अन् ३२८ धावांची विक्रमी भागीदारी

Crime: म्हशीला दरवाजासमोरून नेऊ नका... पत्नीची विनंती, पण पतीचा पारा चढला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य, काय घडलं?

BMC Election: मुंबई महापालिकेत अमराठी चेहऱ्यांचा भरणा! पाच-दहा नव्हे तब्बल 'इतके' जण विजयी

प्लेबॉय वृत्तीचे असतात 'या' जन्मतारखेवर जन्मलेले लोक, सतत पडतात प्रेमात; तुमचाही पार्टनर यात नाही ना ?

WPL 2026, MI vs UPW: मुंबई इंडियन्सचा तिसरा पराभव! एमेलिया केर-अमनज्योत कौर लढल्या, पण लेनिंगची युपी वॉरियर्सच पडली भारी

SCROLL FOR NEXT