मुंबई

आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

CD

आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिकांसाठी रविवारी (ता. १८) रेल्वेच्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्ग, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला आहे, त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत.
मुख्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत अप-डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. या काळात धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत ब्लॉक असून, अनेक लोकल सेवा रद्द करण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावरही पनवेल ते ठाणेदरम्यान काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल चालवण्यात येणार असून, ठाणे ते वाशी/नेरूळ आणि बेलापूर ते उरण मार्गावरील सेवा सुरू राहतील. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था वापरण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT