मुंबई

पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही : शीतल म्हात्रे

CD

पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही : शीतल म्हात्रे

मुंबई, ता. १७ : ‘महापालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. लोकांनी कौल दिला आहे, तो महायुती म्हणून दिला, महायुती म्हणूनच आम्ही सत्तेत येणार आहोत.’ अशी भूमिका शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मांडली. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्यासंदर्भातही माहिती दिली.

शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, ‘आमचे जवळपास २० नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना पालिकेचे कामकाज माहीत नाही. त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोनदिवसीय शिबिर घेतले आहे. त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये राहत आहेत. आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही. आरोप करणाऱ्यांचे नगरसेवकच इकडे-तिकडे फिरत आहेत, याकडे त्यांनी लक्ष द्यावे.’ तसेच महापौरपदाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या नगरसेवकांना मुंबई महापालिकेच्या कामाची पद्धत, विकास आराखडा, वचननाम्याची पूर्तता करणे आणि पुढील पाच वर्षांचा रोडमॅप तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती युवा सरचिटणीस व नगरसेवक अमेय घोले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT