मुंबई

शिवशाहीच्या दुकानांच्या लिलावासाठी भाऊ गर्दी

CD

शिवशाहीच्या दुकानांच्या लिलावासाठी भाऊ गर्दी
३० गाळ्यांसाठी १५० अर्ज; ५० जणांनी अनामत रक्कम भरली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने विक्रीसाठी काढलेल्या ३० दुकानांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार ई-लिलावासाठी आतापर्यंत दीडशे जणांनी नोंदणी केली असून, ५० जणांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. दुकानाच्या खरेदीला मिळणारा प्रतिसाद पाहता आणखी स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून शिवशाहीने ई-लिलावाकरिता अर्ज भरण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे शिवशाहीचे दुकान खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अर्ज करता येणार आहे.
शिवशाही या सरकारी कंपनीचे मुंबईत मानखुर्द आणि शिवडी येथे व्यवसायिक गाळे आहेत. त्याची ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. या गाळ्यांची किंमत १५ ते २८ लाखांच्या घरात आहे. या गळ्यांच्या विक्रीसाठी सुरू केलेल्या ई-लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शिवशाहीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत दीडशे जणांनी नोंदणी केली आहे. १०० जणांनी कागदपत्रे सादर केली आहेत, तर ५० जणांनी अनामत रक्‍कम भरून आपला अर्ज अंतिम केला आहे. दरम्यान, गाळ्यांच्या खरेदीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, अनेकांना अद्याप अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे शिवशाहीने ही जानेवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.

२० कोटींचा निधी अपेक्षित
मानखुर्द येथे ६, तर शिवडी येथे २४ व्यावसायिक गाळे असून, ते वर्षानुवर्षे धूळखात पडून आहेत. त्यांची ई-लिलावसाठी १५-२८ लाख रुपये किंमत ठेवली आहे. या माध्यमातून शिवशाहीला सुमारे २० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. दरम्यान, गेल्या आठ-नऊ वर्षांपासून बंद असलेल्या सदरच्या व्यवसायिक गाळ्यांना नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थ्यी गुड मॉर्निंग न बोलल्याने शिक्षकाचा पारा चढला; रागात मुलांना अमानुष शिक्षा, काय घडलं?

Belagum Fisheries : बेळगावात जलाशयांतून बहरले ‘रूपेरी पीक’; १२,३६० टन मत्स्य उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आधार!

No.1 E-sakal.com Marathi News : जबाबदार आणि लोकाभिमुख पत्रकारितेची पावती; 5.6 कोटी युजर्ससह eSakalची ऐतिहासिक झेप

KDMT Bus: डोंबिवली-ठाणेकरांची लोकल गर्दीतून सुटका होणार, नव्या बससेवा सुरू करणार; कसा असेल मार्ग?

Sindhudurg ZP : दोडामार्गात मतदारांचा कौल बदलाचा; दिग्गजांना मावळतीचा सूर्य, नवख्या चेहऱ्यांचा राजकीय सूर्योदय!

SCROLL FOR NEXT