तक्रार निवारणासाठी
‘आयव्हीआर’ प्रणाली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र वैद्यक परिषदेने डॉक्टर व इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी तक्रार निवारण आणि माहिती मिळविण्यासाठी आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अर्जांशी संबंधित चौकशीचे निरसन तसेच अर्जांच्या स्थितीबाबत रिअल-टाइम अपडेट्स मिळणार आहेत, अशी माहिती परिषदेने दिली आहे.
आयव्हीआर प्रणालीतून अर्जांच्या सद्यस्थितीची रिअल-टाइम माहिती, प्रश्नांची उत्तरे तसेच तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांनी त्यांच्या अर्जांशी संबंधित अडचणी, तक्रारी किंवा माहिती मिळवण्यासाठी या आयव्हीआर प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून करण्यात आले आहे.
आयव्हीआर प्रणालीद्वारे नोंदणी क्रमांक सांगितल्यावर तुमच्या कामाची स्थिती सांगितली जाते. अन्य शंका असल्यास त्या व्यक्तीशी डॉक्टरांचे बोलणे करून देण्यात येते, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे मुंबई प्रबंधक डॉ. राकेश वाघमारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.