मुंबई

धारावीतील ५० शालेय विद्यार्थ्यांनी डब्ल्यूपीएल सामना पाहण्याचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

CD

धारावीतील ५० विद्यार्थ्यांनी पाहिला डब्ल्यूपीएल सामना
डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रत्यक्ष उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : धारावीतील सुमारे ५० शालेय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळाली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यातील महिला प्रीमियर लीग सामन्याला हे विद्यार्थी उपस्थित होते.
ही स्टेडियम भेट धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत गेल्या एक वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या क्रीडाकेंद्रित उपक्रमांचा एक भाग आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुजरात जायंट्स संघातील तीन खेळाडूंनी धारावीला भेट देऊन महिला क्रिकेटपटूंशी संवाद साधला होता. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक क्रीडा सामना थेट पाहण्याचा आयुष्यातील हा पहिलाच अनुभव होता. प्रत्यक्ष मैदानावर खेळ पाहणे हा पूर्णपणे वेगळाच अनुभव आहे. एक दिवस मीही अशाच पातळीवर खेळू शकते, असे मला वाटते अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनींची होती.

मेस्सीला पाहण्याची संधी

धारावीतील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी यापूर्वी एका बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग घेतला होता. याशिवाय धारावीतील सहा होतकरू युवा फुटबॉलपटूंना भारत दौऱ्यावर आलेला जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमला नेण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

Asian Games 2026 Kabaddi : भारतीय पुरुष संघाचा दणदणीत विजय; गतविजेत्यांची दक्षिण कोरियावर ६३-३१ अशी मात

SCROLL FOR NEXT