‘ईव्हीएम’च्या बटणावर
फेव्हिस्टिक लावल्याचा आराेप
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभाग क्रमांक ७६मध्ये ईव्हीएम मशीनवरील ‘घड्याळ’ चिन्हाच्या बटणावर फेव्हिस्टिक टाकून ते जाम केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार बबनराव मदने यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बटण जाम झाल्यामुळे मतदारांना मतदान करता येत नव्हते. राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपने हा जाणीवपूर्वक कट रचल्याचा दावा मदने यांनी केला. स्थानिक आमदार मुरजी पटेल यांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत मशीन बदलण्यात आली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.