बदल्यात हवामानावर चिंता
मुंबईतील दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत विचारमंथन
मुंबई, ता. २२ : जगभरात वेगाने बदलणाऱ्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शाश्वतता, लवचिकता आणि मानवी कल्याण यावर मुंबईतील निर्मला निकेतन संस्था-कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता, सार्वजनिक आरोग्य आणि पोषण, मानसिक आरोग्य, लिंग व सामाजिक न्याय, तंत्रज्ञानातील नवकल्पना, सामाजिक-आर्थिक विषमता, वाढती लोकसंख्या, त्यांचे प्रश्न यावर परिषदेत विचारमंथन करण्यात आले.
‘जीवनमान उन्नती : भूतकाळाचे प्रतिध्वनी आणि शाश्वत, सक्षम भविष्यासाठी दृष्टी’ या विषयावरील परिषदेत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे संयुक्त संस्थान, युनायटेड किंग्डम, मॉरिशस, बांगलादेश, इथियोपिया, व्हिएतनाम आणि फ्रान्स अशा सात देशांतील तसेच भारतातील आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरयाना, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या १७ राज्यांमधील प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऑनलाइन व प्रत्यक्ष अशा संकरित पद्धतीतून २००हून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेतील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे वेस्ट टू एनर्जी रिसर्च टेक्नॉलॉजी कौन्सिलचे संचालक व माजी कुलगुरू प्रा. (डॉ.) अरुण सावंत यांच्या उपस्थितीत झाले. समारोप सत्रात झेवियर इन्स्टिट्यूटचे संचालक व माहिती तंत्रज्ञान प्राध्यापक फादर डॉ. जॉन रोज एस. जे. यांनी उपस्थिती लाभली. राष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून मानसिक आरोग्याचे जीवनमान उन्नतीतील महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेच्या समारोपप्रसंगी आयोजकांनी ही परिषद आंतरशाखीय संशोधन, जागतिक सहकार्य व सामूहिक शैक्षणिक प्रयत्नांची ताकद अधोरेखित करणारी ठरल्याचे नमूद केले. या दोन दिवसांच्या चर्चांमधून निर्माण झालेली ज्ञानसंपदा, भागीदारी व प्रेरणा भविष्यातील संशोधन, धोरणनिर्मिती व शाश्वत, समावेशक आणि सक्षम जागतिक भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत वक्त्यांनी परिषदेला विशेष उंची प्राप्त करून दिली. यामध्ये डॉ. साब्रिना डी. रामसामी-इरानाह (मॉरिशस), प्रा. डॉ. अर्चना हेगडे (ईस्ट कॅरोलिना विद्यापीठ, अमेरिका), प्रा. (डॉ.) हेमराज बी. चंदालिया (जसलोक रुग्णालय, मुंबई), डॉ. ससिकुमार एन. मेनन (टीडीएम लॅब, मुंबई), आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समग्र आरोग्यतज्ज्ञ मिकी मेहता, डॉ. इंग हायब्रेक्ट्स (फ्रान्स) तसेच आर्च्रोमा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व जागतिक प्रमुख अंजनी प्रसाद यांचा समावेश होता.
संस्थेच्या व्यवस्थापन अध्यक्ष सिस्टर फिलोमेना सिक्वेरा, उपाध्यक्ष सिस्टर सबीना गोन्साल्विस, व्यवस्थापक सिस्टर नोएला डायस व सल्लागार समिती सदस्य यांच्या नेतृत्वामुळे परिषदेला भक्कम आधार मिळाला. प्राचार्या व अध्यक्षा डॉ. आशा मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, नैतिक मूल्ये आणि गुणवत्ता या निकषांचे काटेकोर पालन करण्यात आले. परिषद संयोजिका प्रा. डॉ. कामिनी रेगे, सह-संयोजक डॉ. रितू मधन व वृंदा उदैवर यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद इतिहास, वर्तमान व भविष्याचा समन्वय साधणारा सशक्त आंतरशाखीय मंच ठरली.
१२४ संशोधन निबंध सादर
परिषदेत आठहून अधिक मुख्य भाषणे, तीन पूर्णसत्रे, तीन समांतर तांत्रिक सत्रे, पॅनेल चर्चा तसेच १२४ संशोधन निबंधांचे सादरीकरण (ऑनलाइन व प्रत्यक्ष) करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन योगदानासाठी १० बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
फोटो - 312
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.