मुंबई

बनावट दिव्यांगाच्या एसटी प्रवासाला लागणार ब्रेक

CD

बनावट दिव्यांगांच्या सवलतीतील प्रवासाला ब्रेक
एसटीकडून ओळखपत्राची काटेकोर तपासणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २२ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम-२०१६ नुसार राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) दिव्यांग प्रवाशांना मोफत किंवा सवलतीचा प्रवास लाभ दिला जातो. मात्र बनावट ओळखपत्रांचा वापर वाढल्याने आता सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी सूचना दिव्यांग कल्याण विभागाने एसटी महामंडळाला केली होती. त्यानुसार एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी प्रशासनाला याबाबत सूचना केल्या आहेत.
दिव्यांग कल्याण विभागाच्या पत्रानुसार एसटीने वैश्विक दिव्यांग ओळखपत्र कार्डची काटेकोर तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे बनावट कार्डधारकांच्या मोफत किंवा सवलतीच्या प्रवासाला ब्रेक लागणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पात्रतेची खात्री करण्यासाठी पडताळणी प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यानुसार रा. प. आगारातील सर्व वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयातील मार्ग तपासणी पथकाच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड केले जाणार आहे. प्रवासावेळी यूडीआयडी कार्डचा क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करून वैधता तपासली जाणार आहे. वैध कार्ड असल्यास सवलत दिली जाणार अन्यथा कार्ड जप्त करून आगारात जमा केले जाणार आहे. बनावट, अवैध किंवा चुकीचे कार्ड आढळल्यास दिव्यांग हक्क अधिनियम २०१६च्या कलम ९१ नुसार आगार स्तरावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. जप्त कार्डांच्या नोंदी ठेवल्या जाणार असून, दरमहा अहवाल विभागीय कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. या उपाययोजनेमुळे खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळेल आणि सवलतीचा गैरवापर थांबेल. सर्व आगारांत ॲपचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे बनावट कार्डधारक पकडले जातील. त्यांच्याकडून होणारे एसटीचे नुकसान थांबेल, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहेत सूचना?

प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, या सवलतीचा लाभ केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच मिळावा, या दृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. पडताळणीअंती ओळखपत्र वैध असल्यास संबंधितास लाभ देण्यात यावा. तथापि ओळखपत्र बनावट, अवैध अथवा चुकीचे आढळून आल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६च्या कलम ९१ नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच ओळखपत्र जप्त करून त्याबाबत दिव्यांग कल्याण विभागास कळविण्यात यावे, अशा सूचना दिव्यांग कल्याण विभागाने केल्या आहेत.

फोटो - ३०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT