मुंबई

महालक्ष्मी केबल-स्टेड पूल ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्णत्वास

CD

महालक्ष्मी केबल-स्टेड पूल
३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्णत्वास

अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : महालक्ष्मी येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या बहुप्रतीक्षित केबल-स्टेड उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला आहे. या पुलाचा मुख्य आधार असलेल्या ७८.५ मीटर उंच लोखंडी खांबाचे (पायलाॅन) ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा संपूर्ण पूल ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिली. त्यांनी प्रत्यक्ष बांधकामस्थळी जाऊन कामाची पाहणी करून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

​पाहणीदरम्यान अभिजित बांगर यांनी प्रलंबित कामांबाबत संबंधित विभागाला कडक सूचना दिल्या आहेत. बांधकामादरम्यान सुरक्षा मानके आणि तांत्रिक तपासण्यांचे काटेकोर पालन व्हावे. लोखंडी साहित्य आणि फॅब्रिकेशनची कामे वेगाने करण्यासाठी गरज पडल्यास पर्यायी पुरवठादारांची मदत घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. ​या पाहणीच्या वेळी उपआयुक्त गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता राजेश मुळ्ये आणि इतर वरिष्ठ अभियंते उपस्थित होते.
​महालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळ केशवराव खाड्ये मार्गावर हा पूल पश्चिम रेल्वेच्या रुळांवरून जाणार असून, सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना जोडणार आहे. ​पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर स्पॅनचे काम फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या पुलामुळे महालक्ष्मी स्थानक आणि सात रस्ता परिसरातील मोठी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. पर्यावरणाचा विचार करून पुलाच्या नकाशात बदल करून झाडांचे संरक्षण करण्यात आले आहे.
----
वैशिष्ट्ये
- महापालिकेचा पहिला केबल-स्टेड पूल
- पुलाच्या डेकचा भार पेलण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन
- पुलाची एकूण लांबी ८०३ मीटर, तर रुंदी १७.२ मीटर
-----
रेल्वेचा ब्लाॅक आवश्यक
- पूर्वेकडील १६५ मीटर लांबीचा स्पॅन रेल्वे हद्दीत असल्याने रेल्वे विभागाने ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर १५ मार्च ते १५ ऑक्टोबरदरम्यान त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
- पाच खांबांची उभारणी आणि पोहोच रस्ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्थानिक वॉर्ड ऑफिस आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

इलॉन मस्कने लॉन्च केले 'Macrohard'! आता एकटा AI करणार संपूर्ण ऑफिसच काम; किती किंमतीत करता येणार खरेदी? पाहा सर्व माहिती

Summer Hydration Tips: उन्हाळ्यात ‘ही’ 3 पेये ठरतात शरीरासाठी रामबाण; डिहायड्रेशन टाळण्यासाठी तर आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT