मुंबई

पालिका रुग्णालयांत आयुर्वेद उपचार?

CD

पालिका रुग्णालयांत आयुर्वेद उपचार?
पदभरतीच्या जाहिरातीमुळे चर्चा सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : सध्या मुंबई महानगरपालिकेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयात हाउस ऑफिसरच्या एका पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, हे पद आयुर्वेद शाखेतील असल्याने पालिका रुग्णालयांमध्ये आयुर्वेद उपचार सुरू होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, पालिका रुग्णालयांतील उपचारांचा मुख्य आणि मूलभूत पाया हा पूर्णतः ॲलोपॅथीच असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयुर्वेद किंवा अन्य पर्यायी उपचार पद्धती केवळ मोजक्या ठिकाणी आणि मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ट्रामा रुग्णालयात सध्या एक आयुर्वेद डॉक्टर कार्यरत असून, तेथे अनेक दिवसांपासून आयुर्वेदाची ओपीडी सुरू आहे. याच धर्तीवर नायर रुग्णालयातही पूर्वीपासून आयुर्वेद उपचार व पंचकर्म सुविधा उपलब्ध असून, ही कोणतीही नवीन बाब नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. अलीकडे उपनगरीय काही रुग्णालयांमध्येही मर्यादित स्वरूपात आयुर्वेद उपचार सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ज्या रुग्णांना आयुर्वेद उपचारांची गरज आहे किंवा ॲलोपॅथी उपचारांचा अपेक्षित लाभ न मिळालेल्या काही आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून आयुर्वेद मार्गदर्शन आवश्यक असल्यास, अशा रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र, हे उपचार सर्व पालिका रुग्णालयांमध्ये लागू नाहीत. मुंबई महापालिकेच्या स्वतंत्र आयुर्वेद दवाखान्यांची संख्या सध्या चार ते पाच असून, आयुर्वेदसह युनानी उपचार पद्धतीचे दोन दवाखानेही कार्यरत आहेत.
...
पालिका रुग्णालयांतील उपचारांचा मुख्य आधार ॲलोपॅथीच आहे. आयुर्वेद किंवा अन्य कोणत्याही पॅथीच्या उपचार पद्धती अत्यंत मर्यादित असून, त्या केवळ रुग्णांची गरज लक्षात घेऊन उपलब्ध करून दिल्या आहेत.
- डॉ. शैलेश मोहिते, संचालक, प्रमुख रुग्णालये, मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT