मुंबई

राज्यात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार

CD

राज्यात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार
मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात अभ्यासाअंती आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २२) मंत्रालयात आढावा बैठक झाली. राज्यात गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन व गृह विभागाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्याचे तसेच अवैध गुटखाविक्री करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.
...
कायदा अधिक कठोर करणार!
अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ म्हणाले, की राज्यात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी आहे. अवैध व्यवहारावर अधिक कठोर कायदेशीर कारवाईसाठी गुटखा विक्रेत्यांवर मकोका लागू करण्याबाबत कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून गुटखा व्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांनाही ‘मकोका’च्या कक्षेत आणण्यासाठी कायदा अधिक कठोर केला जाणार आहे.
...
कठोर कारवाईचे निर्देश
१. गुटखाविक्री व वाहतुकीविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विविध जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे. गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर मकोका लागू करण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतुदी सुचविण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने गृह विभाग व विधी व न्याय विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी दिले.
२. विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर तातडीने आणि कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचेही अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Iran Tensions : ट्रम्प यांनी धमकी देताच खामेनी बंकरमध्ये लपले, इराणने भारताचे 'या' मुळे मानले आभार

Malabar Gold Fraud : मलबार गोल्डला नाशिकमध्ये गंडा! कुरिअरमधून १० लाखांचे सोन्याचे कॉईन्स गायब; अशी झाली फसवणूक

Nagpur : अपघातात बहि‍णींचा मृत्यू, एकीचं ७ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, दुसरी महिन्याभराने चढणार होती बोहल्यावर

Karad South politics: कऱ्हाड दक्षिणेत पुन्हा उंडाळकर विरूध्द उंडाळकर; जिल्हा परिषदेच्या रणांगणात भाजपच्या अतुल भोसले यांची मोठी खेळी!

Latest Marathi news Live Update : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचवले

SCROLL FOR NEXT