मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांच्यात विद्युत पारेषण क्षेत्रातील उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार तांत्रिक सल्लागार सेवा, वीज प्रणाली अभ्यास, नवीकरणीय ऊर्जेचे एकत्रीकरण, उपकरणांचा वापर, स्मार्ट ग्रिड, डिजिटलायझेशन तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्तपणे काम केले जाणार आहे. हा करार व्हीजेटीआयचे संचालक डॉ. सचिन कोरे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता (एसटीयू) पियूष शर्मा यांनी केला. या वेळी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.