विमान अपघातातील जखमीला जीवदान
मुंबईतील रुग्णालयात दाम्पत्यावर यशस्वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ओडिशातील भुवनेश्वरहून राऊरकेला येथे जात असलेल्या विमानाच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अग्रवाल दाम्पत्याला मुंबईतील डॉक्टरांनी नवजीवन दिले. प्रगत ट्रॉमा केअर, शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून १० दिवस उपचार झाल्यानंतर दाम्पत्याला लग्नाच्या वाढदिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. फोर्टिस मुलुंड रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातच केक कापून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
अपघाताचा थरार आठवताना सुनील अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही भुवनेश्वरहून राऊरकेला येथे एका खासगी कार्यक्रमासाठी जात होतो. मित्राच्या पालकांच्या लग्नाच्या ५०व्या वर्षगाठीनिमित्त हा प्रवास होता. उड्डाणानंतर सुमारे १० किलोमीटर अंतरावर विमानाचे इंजिन निकामी झाले आणि पायलटने शेतात आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे क्रॅशमध्ये रूपांतर झाले. अपघातानंतर गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
सुनील अग्रवाल पुढे म्हणाले की, प्राथमिक उपचारानंतरच स्पष्ट झाले की आम्हा दोघांनाही मल्टिपल फ्रॅक्चर आणि गंभीर दुखापती झाल्या आहेत. दुखापती खूपच गुंतागुंतीच्या होत्या. यानंतर वेगवेगळ्या एअर ॲम्ब्युलन्सद्वारे सुनील आणि त्यांची पत्नी सबिता अग्रवाल यांना मुंबईत आणण्यात आले आणि फोर्टिस मुलुंड रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखालील ट्रॉमा टीमने त्यांच्यावर उपचार केले. सबिता अग्रवाल यांच्या फिमर फ्रॅक्चरसोबत पेल्विक आणि स्पाइनवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर सुनील अग्रवाल यांच्या गुडघ्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
लग्नाच्या वाढदिवशी डिस्चार्ज
फोर्टिसच्या टीमने आमच्यासोबत केक कटिंग केला. तो क्षण आमच्यासाठी अत्यंत भावनिक होता, असे अग्रवाल यांनी सांगितले. उपचारानंतर लग्नाच्या वाढदिवशी दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.